lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने पुन्हा ६०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी महाग

सोने पुन्हा ६०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी महाग

शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:35 AM2019-08-25T06:35:51+5:302019-08-25T06:35:56+5:30

शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली

Gold price incresed by Rs 600 and silver by Rs 1000 | सोने पुन्हा ६०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी महाग

सोने पुन्हा ६०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी महाग

जळगाव : सोने-चांदीच्या भावात तेजी सुरूच असून, शनिवारी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपये प्रति तोळ्याने वाढ होऊन ते ३८ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ४५ हजारांवर पोहोचली आहे.
अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत.


शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली, तरी सोने ६०० रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली. विदेशात वाढलेली या धातूंची खरेदी व विदेशी वायदे बाजारातून निघणारे वाढीव भाव, यामुळे भारतातही भाव वाढत आहेत.

Web Title: Gold price incresed by Rs 600 and silver by Rs 1000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.