Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने १0 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

सोने १0 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

स्टॉकिस्टकडून विक्रीचा दबाव वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळले

By admin | Updated: May 24, 2014 04:17 IST2014-05-24T04:17:43+5:302014-05-24T04:17:43+5:30

स्टॉकिस्टकडून विक्रीचा दबाव वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळले

Gold at the 10-month low | सोने १0 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

सोने १0 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली : स्टॉकिस्टकडून विक्रीचा दबाव वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळले. शुक्रवारी सोन्याचे भाव ३०० रुपयांनी घसरून दहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले. या घसरणीसह सोन्याचे भाव २८,२५० प्रतितोळा झाले. दुसरीकडे खरेदीच्या पाठबळामुळे चांदीचे भाव ५० रुपयांनी वाढून ४१,७०० रुपये प्रतिकिलो झाले. दिल्ली सराफा बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव अनुक्रमे २८,२५० आणि २८,०५० रुपये प्रति तोळ्यावर बंद झाले. यापूर्वी सोने आॅगस्ट २०१३ मध्ये कोसळले होते. गिन्नीचे भाव २४,८०० रुपये प्रति आठ ग्रॅमवर जैसे थे राहिले. तयार चांदीचे भाव ५० रुपयांनी वाढून ४१,७०० रुपये प्रतिकिलो झाले, तर साप्ताहिक डिलिव्हरी चांदीचे भाव ९० रुपयांनी कमी होऊन ४०,९०० रुपयांवर बंद झाले. चांदीच्या नाण्यांचा भाव जैसे थे राहिला. शेअर बाजार तेजीत असल्यास सराफा बाजार मंदीत येतो, असा अनुभव आहे. सध्या शेअर बाजार तेजीत आहे. यासोबतच केंद्र सरकारने सोने आयातीवर निर्बंध हटविल्याचा आणखी परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. आयात वाढणार असल्यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold at the 10-month low