lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या

गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या

बाबा रामदेव यांच्या या प्लॅनिंगमुळे कुठे ना कुठे गौतम अदानी समूहासाठी आव्हान उभे राहू शकते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:42 PM2022-09-16T16:42:28+5:302022-09-16T16:43:29+5:30

बाबा रामदेव यांच्या या प्लॅनिंगमुळे कुठे ना कुठे गौतम अदानी समूहासाठी आव्हान उभे राहू शकते...

Gautam Adani's tension will increase Know about the Baba Ramdev's planning for the next 40 years | गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या

गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या

योगगुरू बाबा रामदेव यांनी नुकतीच पतंजली समूहाच्या 4 कंपन्यांचे IPO आणण्याची घोषणा केली आहे. याच बोरबर  त्यांनी आधीपासूनच लिस्टेड असलेल्या पतंजली फूड्स लिमिटेडच्या प्लॅनिंग संदर्भातही माहिती दिली आहे. मात्र, बाबा रामदेव यांच्या या प्लॅनिंगमुळे कुठे ना कुठे गौतम अदानी समूहासाठी आव्हान उभे राहू शकते. तर जाणून घेऊयात कसे...?

असं आहे बाबा रामदेव यांचं प्लॅनिंग -
पाम तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पतंजली समूहाने तब्बल 15 लाख एकरहून अधिक जमिनीवर पामची झाडे लावण्याची घोषणा केली आहे. एकूण 11 राज्यांतील 55 जिल्ह्यांमध्ये ही झाडे लावण्यात येणार आहेत. यासंदर्भात, पतंजलीने दावा केला आहे, की कोणत्याही कंपनीकडून करण्यात आलेली ही भारतातील सर्वात मोठी पाम लागवड असेल. यापासून 5 ते 7 वर्षांत सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा वार्षिक परतावा मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. याचबरोबर, एकदा पामची झाडे लावल्यानंतर पुढील 40 वर्षांपर्यंत त्याचे उत्पन्न मिळत राहील.

अर्थव्यवस्थेलाही मिळेल चालना -
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटल्यानुसार, यामुळे देश खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल आणि आयातीवर खर्च होणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाचेल. पतंजलीचा अंदाज आहे, की यामुळे तब्बल 3 लाख कोटी रुपयांपर्यंतचे परकीय चलन वाचेल. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयाही चालनाही मिळेल.

अदानी सर्वात मोठे प्रतिस्पर्धक: 
किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या दोन मोठ्या कंपन्या म्हणजेच, गौतम अदानी यांची अदानी विल्मार आणि रामदेव यांची पतंजली फूड्स लिमिटेड. अदानी विल्मार हा पतंजली समूहाच्या या कंपनीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धक आहे. या ना त्या निमित्ताने, अनेकांच्या स्वयंपाकघरात या दोन्ही कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. तसेच या दोन्ही कंपन्या शेअर बाजारातही लिस्ट आहेत.

Web Title: Gautam Adani's tension will increase Know about the Baba Ramdev's planning for the next 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.