lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मालामाल झाले गौतम अदानी, एका दिवसात १.९२ लाख कोटींचा फायदा; कंपन्यांचं m-Cap तुफान वाढलं

मालामाल झाले गौतम अदानी, एका दिवसात १.९२ लाख कोटींचा फायदा; कंपन्यांचं m-Cap तुफान वाढलं

तीन राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:32 AM2023-12-06T10:32:30+5:302023-12-06T10:33:03+5:30

तीन राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

Gautam Adani gains wealth 1 92 lakh crore profit in one day Companies m Cap increased stock market bse nse | मालामाल झाले गौतम अदानी, एका दिवसात १.९२ लाख कोटींचा फायदा; कंपन्यांचं m-Cap तुफान वाढलं

मालामाल झाले गौतम अदानी, एका दिवसात १.९२ लाख कोटींचा फायदा; कंपन्यांचं m-Cap तुफान वाढलं

Adani Group Shares : तीन राज्यांतील निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यानंतर याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या शेअर्समध्येही (Adani Group Shares) तुफान वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २०-२० टक्क्यांनी वाढ झाली. यासह अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ११ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे.

मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. अदानी समूहानं एका दिवसात आपल्या मार्केट कॅपमध्ये १.९२ लाख कोटी जोडून आपला आतापर्यंतचा सर्वात्कृष्ट सिंगल डे मार्केट परफॉर्मन्स दाखवलाय. यासह, गौतम अदानी ७०.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह (gautam adani net worth)जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १६ व्या स्थानावर पोहोचले आहेत.

शेअर्समध्ये तुफान तेजी
मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १७.०३ टक्क्यांनी किंवा ४३०.८० रुपयांनी वाढून २९६०.१० वर बंद झाला. अदानी पोर्टचे शेअर्स १५.१५ टक्क्यांनी किंवा १३३.१० रुपयांनी वाढून १०११.८५ रुपयांवर बंद झाले. अदानी पॉवरचा शेअर १५.९१ टक्क्यांनी किंवा ७३.९० रुपयांनी वाढून ५३८.५० रुपयांवर बंद झाला.

अदानी एनर्जी, ग्रीनमध्ये अपर सर्किट
अदानी एनर्जीचा शेअर २० टक्क्यांनी किंवा १८०.४० रुपयांनी वाढून १०८२.६० वर बंद झाला. अदानी ग्रीनचा शेअर २० टक्क्यांनी किंवा २२४.६५ रुपयांनी वाढून १३४८ रुपयांवर बंद झाला. अदानी टोटलचे शेअर्स १९.९५ टक्क्यांनी किंवा १४६.०५ रुपयांनी वाढून ८७८.२० रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, अदानी विल्मरचे शेअर्स ९.९३ टक्क्यांनी किंवा ३४.४० रुपयांनी वाढून ३८०.७० रुपयांवर बंद झाले.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Gautam Adani gains wealth 1 92 lakh crore profit in one day Companies m Cap increased stock market bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.