PayDay Sale 2025 : तुम्हाला विमानाने फिरण्याची हौस असेल पण महागड्या तिकीटांमुळे कधी गेला आहे? तर आता संधी चालून आली आहे. सणासुदीच्या तोंडावर हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे! एयर इंडिया एक्सप्रेसने 'पेडे सेल २०२५' ची घोषणा केली आहे. या धमाकेदार ऑफरअंतर्गत देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट फक्त १,२०० रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय मार्गांवरील तिकीट ३,७२४ रुपयांपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी अशीच ऑफर इंडीगो या विमान कंपनीने देखील आणली होती.
तुम्ही १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या सेलचा लाभ घेऊन तिकीट बुक करू शकता. या बुक केलेल्या तिकिटांवर १२ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रवास करता येणार आहे.
कसे कराल बुकिंग?
- बुकिंग कालावधी: या ऑफरसाठी बुकिंग २८ सप्टेंबर २०२५ पासून सर्व चॅनेलवर सुरू होईल.
- अर्ली ॲक्सेस: जर तुम्हाला एक दिवस आधी, म्हणजेच २७ सप्टेंबरपासून बुकिंग करायचे असेल, तर तुम्ही एयर इंडिया एक्सप्रेसच्या वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर 'FLYAIX' हा कोड वापरून 'अर्ली ॲक्सेस'चा फायदा घेऊ शकता.
- कंपनीने हा 'लिमिटेड पीरियड ऑफर' असल्याने, ग्राहकांना लवकर बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे.
किती असेल प्रवासाचे भाडे?
एयर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांच्या सोयीसाठी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तिकीट दर जाहीर केले आहेत
Xpress Lite श्रेणी: (यात चेक-इन बॅगेजची परवानगी नाही.)
देशांतर्गत तिकिटांची किंमत १,२०० रुपयांपासून सुरू.
आंतरराष्ट्रीय तिकिटांची किंमत३,७२४ रुपयांपासून सुरू.
Xpress Value श्रेणी:
देशांतर्गत तिकिटांची किंमत १,३०० रुपयांपासून सुरू.
आंतरराष्ट्रीय तिकिटांची किंमत ४,६७४ रुपयांपासून सुरू.
ॲप बुकिंगवर अतिरिक्त फायदे
- एयरलाइन आपल्या मोबाईल ॲपवरून केलेल्या बुकिंगवर कन्व्हिनियन्स फीस आकारणार नाही. याव्यतिरिक्त, प्रवाशांना इतरही फायदे मिळतील.
- सवलतीच्या दरात बॅगेज: चेक-इन बॅगेजवर सवलतीचा दर मिळेल. देशांतर्गत फ्लाइट्सवर १५ किलोसाठी १,५०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर २० किलोसाठी २,५०० रुपये चार्ज आकारला जाईल.
- FabDeals: या सेलमध्ये प्रवाशांना फक्त स्वस्त तिकिटेच नव्हे, तर 'हॉट मील्स', सीट सिलेक्शन, अतिरिक्त बॅगेज आणि 'एक्स्प्रेस अहेड प्रायोरिटी सर्व्हिसेस'वरही खास ऑफर दिल्या जातील.
या 'पेडे सेल'मुळे सणासुदीच्या काळात कमी बजेटमध्ये हवाई प्रवास करण्याची एक उत्तम संधी प्रवाशांना मिळाली आहे.