पणकोडोली : येथील गावकामगार तलाठी कार्यालयातील फेरफार नोंदवहीच गायब झाल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत चार व्यक्तींची नावे संशयित म्हणून तहसीलदार यांचेकडे कळवली असून, नोंदवही शोधण्यात महसूल खात्याला यश मिळणार का? कोणत्या हेतूने ही वही गायब केली आहे. याबाबत तर्क वितर्क केले जात आहेत. अथक विश्वासार्हतेचा दणका तलाठ्यांना बसला असून संबंधित दप्तर गायब करणार्यांवर कायदेशीर कारवाई होणार की गावपातळीवर प्रकरण मिटले जाणार,याची चर्चा सुरू आहे. तलाठी कोतवाल आणि दोन अंशकालीन कर्मचारीमार्फत तलाठी कार्यालयाचा कारभार चालविला जातो. तळंदगे फाटा येथील एक इसम फेरफार नोंदवहीबाबत चौकशी करण्यास कार्यालयात आला होता. संबंधित वहीची शोधाशोध केली असता ही वहीच गायब झाल्याचेही निदर्शनास आले. या प्रकारानंतर तलाठी यांनी नोंदवहीची शोधमोहीम सुरू ठेवली. चार दिवसांपासून शासकीय दप्तर गायब होऊनसुद्धा महसूल विभागाने कोणतेच ठोस पाऊल उचलले नसल्याने तर्कवितर्काची चर्चा सुरू आहे.
पणकोडोली सज्जातून फेरफार नोंदवही गायब
पणकोडोली : येथील गावकामगार तलाठी कार्यालयातील फेरफार नोंदवहीच गायब झाल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत चार व्यक्तींची नावे संशयित म्हणून तहसीलदार यांचेकडे कळवली असून, नोंदवही शोधण्यात महसूल खात्याला यश मिळणार का? कोणत्या हेतूने ही वही गायब केली आहे. याबाबत तर्क वितर्क केले जात आहेत. अथक विश्वासार्हतेचा दणका तलाठ्यांना बसला असून संबंधित दप्तर गायब करणार्यांवर कायदेशीर कारवाई होणार की गावपातळीवर प्रकरण मिटले जाणार,याची चर्चा सुरू आहे.
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:07+5:302014-09-12T22:38:07+5:30