Lokmat Money > बिझनेस न्यूज > सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?

सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?

Crude Oil Price: जगात असा एक देश आहे, जिथे १ लिटर पेट्रोल २.५० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 14:42 IST2025-08-17T14:41:16+5:302025-08-17T14:42:58+5:30

Crude Oil Price: जगात असा एक देश आहे, जिथे १ लिटर पेट्रोल २.५० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते.

Crude Oil Price: In Libya, 1 liter of petrol is available for only Rs 2.5; What is India's number..? | सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?

सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?

Crude Oil Price: जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड अस्थिरता आहे. भारतातही या तणावाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसून येत आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, जगात एक असा देश आहे, जिथे पेट्रोल पेट्रोल अडीच रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते. 

११ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या जागतिक पेट्रोल किमतींच्या आकडेवारीनुसार, लिबियामध्ये तेलाची किंमत २.४५ रुपये प्रति लिटर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगभरातील विविध देशांमधील पेट्रोलच्या किमतींची आकडेवारीवर जारी केली आहे. या आकडेवारीच्या मते जगातील सर्वात स्वस्त तेल लिबियामध्ये उपलब्ध आहे. तर, इराण आणि व्हेनेझुएला लिबियाच्या खाली आहेत.

येथे सर्वात स्वस्त तेल उपलब्ध 
अहवालानुसार, लिबियानंतर, इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे तेलाची किंमत २.५४ रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर व्हेनेझुएला येतो, जिथे १ लिटर तेलाची किंमत ३.०७ रुपये आहे. व्हेनेझुएला नंतर कुवेत, अल्जेरिया, इजिप्त, कझाकस्तान, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि युएई आहेत.  तर, या यादीमध्ये भारताचा २१ वा नंबर आहे.

लिबिया कुठे आहे
इराण आणि व्हेनेझुएला स्वस्त तेलासाठी ओळखले जातात, मात्र आता लिबियाने त्यांनाही मागे सोडले आहे. आपण लिबियाच्या भौगोलिक स्थानाबद्दल बोललो तर, तो उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. येथे तेलाचे साठे आहेत. ते उत्तरेला भूमध्य समुद्राशी आणि पूर्वेला इजिप्तशी जोडलेले आहे. तर, पश्चिमेला ट्युनिशिया आणि अल्जेरिया, दक्षिणेला नायजर, चाड आणि सुदानशी सीमा लागते.

Web Title: Crude Oil Price: In Libya, 1 liter of petrol is available for only Rs 2.5; What is India's number..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.