Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सामान्य प्रशासन विभागातील लिपिक निलंबित

सामान्य प्रशासन विभागातील लिपिक निलंबित

सीईओ काकाणींचा दणका: नियुक्तीपत्रे देण्यासाठी पैशाची मागणी

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:30+5:302014-09-12T22:38:30+5:30

सीईओ काकाणींचा दणका: नियुक्तीपत्रे देण्यासाठी पैशाची मागणी

The clerk suspended from the General Administration Department | सामान्य प्रशासन विभागातील लिपिक निलंबित

सामान्य प्रशासन विभागातील लिपिक निलंबित

ईओ काकाणींचा दणका: नियुक्तीपत्रे देण्यासाठी पैशाची मागणी
सोलापूर: पैसे न दिल्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची नियुक्ती पत्रे अडवून ठेवणार्‍या सामान्य प्रशासन विभागातील लिपिक शाहू गायकवाड यांना जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी निलंबित केल़े यामुळे सामान्य प्रशासन विभागातील बाजार चव्हाट्यावर आला आह़े उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणे टाळल़े
अनुकंपा तत्त्वारील सहा उमेदवारांची निवड करुन सीईओ काकाणी यांनी ही नियुक्तीपत्रे त्या त्या उमेदवारांना देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्याकडे पाठवली होती़ सीईओंची सही झाल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी 10 सप्टेंबर रोजी जाधव यांची सही झाली़ 11 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांचे स्वीस सहायक पाठपुरावा करीत असलेल्या एका उमेदवाराचे नियुक्तीपत्र दिले; मात्र उर्वरित उमेदवारांची नियुक्तीपत्रे दिली नाहीत़ त्यामुळे तक्रारीची शहानिशा सामान्य प्रशासन विभागातील लिपिक शाहू गायकवाड यांचा टेबल तपासण्यात आला़ त्यांचे कपाटही तपासले, त्यावेळी गायकवाड जागेवर नव्हते. त्यामुळे पंचनामा करुन उर्वरित नियुक्तीपत्रे त्या त्या उमेदवारांना पाठविण्यात आली आणि गायकवाड यांना दप्तरदिरंगाईचे कारण पुढे करीत निलंबित करण्यात आल़े सामान्य प्रशासन विभागातील बाजार यामुळे चव्हाट्यावर आला आह़े
काकाणी यांनी शिरापूर, पाटकूल आदी गावांना भेटी दिल्या. पाटकूल येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून 2.25 कोटींची योजना काकाणी यांनी मंजूर केली.
कोट़़
अनुकंपा तत्त्वावरील सहा उमेदवारांची निवड केली होती़ माझी सही 5 सप्टेंबरला झाली़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांची सही 10 सप्टेंबरला झाली, त्यामुळे 11 रोजी नियुक्तीपत्रे देणे अपेक्षित होते; मात्र लिपिक शाहू गायकवाड या लिपिकाने ही नियुक्तीपत्रे वेळेवर दिली नाहीत़ तपासणी केली असता ते कार्यालयात नव्हते, त्यांना निलंबित केले आह़े
सुरेश काकाणी
सीईओ, जि़प़
चौकट़़़
तिघांना नोटिसा़़़
जि़प़ सीईओ सुरेश काकाणी यांनी गुरुवारी शिरापूर आणि पाटकूल प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या़ शिरापूर आरोग्य केंद्राचे डॉ़ गव्हाणे हे गेल्या दोन दिवसांपासून केंद्रात नसल्यामुळे तसेच फार्मासिस्ट सय्यद यांनी व्यवस्थित स्टॉक नोंद न केल्यामुळे दोघांनाही सीईओंनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ शिक्षण विभागात पदोन्नतीद्वारे बदली केलेले वरिष्ठ सहायक माने-देशमुख हे रुजू झाले नाहीत म्हणून त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे काकाणी यांनी सांगितल़े

Web Title: The clerk suspended from the General Administration Department