Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!

Health Insurance : इंटरनेटमुळे आरोग्य विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. परंतु, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ऐनवेळी खिशातून उपचारांचा खर्च भरावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:36 IST2025-12-17T17:35:42+5:302025-12-17T17:36:28+5:30

Health Insurance : इंटरनेटमुळे आरोग्य विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. परंतु, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ऐनवेळी खिशातून उपचारांचा खर्च भरावा लागेल.

Buying Health Insurance Online? Avoid These 5 Common Mistakes to Ensure Claim Settlement | ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!

Health Insurance : इंटरनेटच्या विस्तारामुळे आता घरबसल्या आरोग्य विमा खरेदी करणे अत्यंत सोपे झाले आहे. पारदर्शकता, कागदपत्रांशिवाय होणारी प्रक्रिया आणि विविध योजनांची तुलना करण्याची सोय यामुळे ऑनलाइन विमा खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, विमा एजंट नसल्यामुळे अनेकदा तांत्रिक गोष्टी समजून घेताना चुका होतात. या लहान चुकांमुळे आणीबाणीच्या वेळी तुमचा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो.

स्वस्त प्रीमियमचा 'सापळा' ओळखा
अनेक ग्राहक केवळ कमी प्रीमियम पाहून पॉलिसी निवडतात. मात्र, स्वस्त प्लॅनमध्ये अनेकदा रूम रेंट कॅपिंग, सब-लिमिट आणि को-पे सारख्या कडक अटी असतात. केवळ कर सवलत मिळवण्यासाठी विमा न घेता, तो कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे.

ऑनलाइन विमा घेताना 'या' गोष्टींची खबरदारी घ्या
१. आजारांची माहिती लपवू नका (सर्वात मोठी चूक) :

प्रपोजल फॉर्म भरताना जुने आजार, शस्त्रक्रिया किंवा सुरू असलेली औषधे यांची माहिती लपवू नका. बहुतेक क्लेम रिजेक्शन हे चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे होतात. प्रामाणिकपणे दिलेली माहिती तुमच्या भविष्यातील क्लेमची हमी असते.

२. रूम रेंट मर्यादा
तुमच्या पॉलिसीमध्ये कोणत्या श्रेणीतील खोली समाविष्ट आहे हे तपासा. जर तुम्ही मर्यादेपेक्षा महागडी खोली निवडली, तर केवळ खोलीचे भाडेच नाही, तर संपूर्ण हॉस्पिटल बिलावर मोठी कपात होऊ शकते.

३. कॅशलेस नेटवर्क
विमा घेण्यापूर्वी तुमच्या शहरातील प्रमुख रुग्णालये त्या कंपनीच्या 'नेटवर्क हॉस्पिटल'मध्ये आहेत का, हे तपासा. कॅशलेस सुविधेमुळे खिशातून पैसे न भरता उपचार घेणे सोपे होते.

४. ओपीडी आणि ॲड-ऑन कव्हर्स
बहुतेक पॉलिसींमध्ये ओपीडी खर्च समाविष्ट नसतो. तुम्हाला गरज असल्यास त्यासाठी वेगळा 'ॲड-ऑन' घ्यावा लागतो. तसेच, टॉप-अप प्लॅन घेताना त्याचा 'डिडक्टिबल' आकडा तुमच्या मूळ पॉलिसीशी जुळतो की नाही, हे तपासा.

५. वेटिंग पिरियड
विमा घेतल्या घेतल्या लगेच सर्व आजारांचे कव्हर मिळत नाही. काही आजारांसाठी २ ते ४ वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. हा काळ नीट समजून घ्या.

वाचा - निवृत्तीवेळी १ कोटी रुपयांचा फंड हवाय? मग आतापासूनच गुंतवणुकीचे 'हे' नियम फोलो करा

तज्ज्ञांचा सल्ला
जर तुमची शस्त्रक्रिया नियोजित असेल, तर हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या ३ ते ५ दिवस आधीच 'प्री-ऑथोरायझेशन' प्रक्रिया सुरू करा. यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल.

Web Title : ऑनलाइन हेल्थ इंश्योरेंस खरीदते समय इन 5 गलतियों से बचें!

Web Summary : ऑनलाइन हेल्थ इंश्योरेंस खरीदना आसान है, लेकिन गलतियों से क्लेम रिजेक्ट हो सकता है। मेडिकल हिस्ट्री न छुपाएं, रूम रेंट लिमिट समझें, नेटवर्क हॉस्पिटल चेक करें, ओपीडी ऐड-ऑन देखें और वेटिंग पीरियड जानें। नियोजित सर्जरी के लिए प्री-ऑथराइजेशन जरूरी है।

Web Title : Avoid these 5 mistakes while buying health insurance online!

Web Summary : Buying health insurance online is easy, but mistakes can lead to claim rejection. Don't hide medical history, understand room rent limits, check network hospitals, consider OPD add-ons, and know the waiting period. Pre-authorization is crucial for planned surgeries.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.