lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > budget 2021 : सोने- चांदीवरील आयात शुल्कामध्ये कपात

budget 2021 : सोने- चांदीवरील आयात शुल्कामध्ये कपात

budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे. सध्या १२.५ टक्के असलेले हे शुल्क ७.५ टक्क्यांवर आणले जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 05:02 AM2021-02-02T05:02:42+5:302021-02-02T05:04:05+5:30

budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे. सध्या १२.५ टक्के असलेले हे शुल्क ७.५ टक्क्यांवर आणले जाणार आहे.

budget 2021 : Reduction in import duty on gold and silver | budget 2021 : सोने- चांदीवरील आयात शुल्कामध्ये कपात

budget 2021 : सोने- चांदीवरील आयात शुल्कामध्ये कपात

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे. सध्या १२.५ टक्के असलेले हे शुल्क ७.५ टक्क्यांवर आणले जाणार आहे. यामुळे सोन्याच्या तस्करीला पायबंद बसेल, असे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून चांदीच्या दरामध्ये एक हजार रुपये प्रति किलो तर सोने ५०० रुपये प्रति १० ग्रॅम अशी घट झाली आहे.  

७.५%पर्यंत सोने आणि चांदीवरील  आयात शुल्क कमी केले 
यंदाच्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचा व्यावसायिकांसह ग्राहकांनाही लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

चांदीत घसरण; सोन्याच्या भावात घट
नवी दिल्ली/जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार होताना दिसून आला व एकाच दिवसात तीन वेळा सोने-चांदीचे भाव बदलले. यात अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच भाववाढ झाली, तर अर्थसंकल्पादरम्यान आयात शुल्क कमी केल्याची घोषणा झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी झाले. दिवसभरातील या चढ-उतारानंतर चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर, तर सोने ४९ हजार ९०० रुपयांवर स्थिरावले.

Web Title: budget 2021 : Reduction in import duty on gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.