lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या वर्षात 'अशाप्रकारे' वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर, स्वस्त कर्ज मिळण्यास होईल मदत

नव्या वर्षात 'अशाप्रकारे' वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर, स्वस्त कर्ज मिळण्यास होईल मदत

नव्या वर्षात चांगले आर्थिक नियोजन करण्याची आणि त्या दिशेने योजना आखण्याची योग्य वेळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:36 AM2023-12-29T10:36:25+5:302023-12-29T10:38:28+5:30

नव्या वर्षात चांगले आर्थिक नियोजन करण्याची आणि त्या दिशेने योजना आखण्याची योग्य वेळ आहे.

Boost your credit score in the new year will help you get cheap loans cibil score details | नव्या वर्षात 'अशाप्रकारे' वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर, स्वस्त कर्ज मिळण्यास होईल मदत

नव्या वर्षात 'अशाप्रकारे' वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर, स्वस्त कर्ज मिळण्यास होईल मदत

लवकरच नवे वर्ष सुरू होणार आहे. नव्या वर्षात चांगले आर्थिक नियोजन करण्याची आणि त्या दिशेने योजना आखण्याची योग्य वेळ आहे. यासोबतच आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे, चांगला क्रेडिट स्कोर बनिवण्याचा. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच लवकर आणि कमी व्याजदराने कर्ज मिळते. म्हणूनच आपल्या क्रेडिट स्कोरवर वेळोवेळी लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते. नव्या वर्षात काही गोष्टींवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहील...

क्रेडिट स्कोरचा फायदा काय?
३०० ते ९०० अंकांपर्यंत कोणत्याही व्यक्तिचा क्रेडिट स्कोर राहतो. त्यावरून त्या व्यक्तीची आर्थिक स्थिरता आणि पतक्षमता कळते. त्यावरुन कर्ज देणाऱ्या कंपन्यांना मदत मिळते. क्रेडिट स्कोर चांगला असल्यास कर्ज घेताना अडचण होत नाही. तसेच इतरांच्या तुलनेत व्याजदरही कमी राहतो.

कसा वाढेल तुमचा क्रेडिट स्कोर?
क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी कोणत्याही बिलाचे पैसे वेळेत भरा. महत्त्वाचे म्हणजे, क्रेडिट कार्डचे बिल नेहमी वेळेच्या आत केले पाहिजे. विलंब झाल्यास दंड तर भरावा लागतोच. पण, थकीत रकमेवर खूप जास्त व्याजही भरावे लागते. कोणतेही कर्ज घेतलेले असल्यास चुकीनेही हप्ता चुकवू नका.

क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा
ठरावीक अंतराने क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. त्यात काही चूक आढळल्यास तातडीने उपाययोजना करता येते व क्रेडिट स्कोर खराब होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

गरज असेल तरच घ्या 
नवे कार्ड किंवा कर्जासाठी सतत अर्ज करणे टाळायला हवे. गरज असेल तरच यासाठी अर्ज करा. एखाद्यावेळी कर्ज किंवा कार्ड नाकारल्यास क्रेडिट स्कोर कमी होतो.

क्रेडिट किंवा तुमची पत संतुलित ठेवा
अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात. हे कर्ज असुरक्षित श्रेणीत येते. असे कर्ज जास्त घेतल्यास क्रेडिट स्काेरवर परिणाम हाेताे. गृहकर्ज, वाहन कर्ज यासारखी कर्जे सुरक्षित श्रेणीत येतात. यातून तुमची कर्ज घेण्याची सवय लक्षात येते. याबाबत काळजी घ्या.

Web Title: Boost your credit score in the new year will help you get cheap loans cibil score details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.