lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

१ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका; कपडे, मोबाइल स्वस्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 09:14 AM2022-03-30T09:14:12+5:302022-03-30T09:14:55+5:30

सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका; कपडे, मोबाइल स्वस्त होणार

Big changes to come into effect from 1 April from medicine to cryptocurrency all you need know! | १ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

१ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपणार असून, १ एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२३ ला सुरुवात होणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामुळे सामान्यांपासून श्रीमंतांवरही परिणाम होणार आहेत.

पोस्ट ऑफिस योजना
१ एप्रिलपासून पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये बदल करण्यात येणार आहे. आता ग्राहकांना टाइम डिपॉझिट खाते,  ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते अथवा बँक खाते उघडावे लागणार आहे. 
तसेच लहान बचत योजनेमध्ये जे व्याज मिळत होते ते आता पोस्ट ऑफिसचे बचत खाते किंवा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच अगोदरपासूनच असलेले बँक खाते अथवा पोस्ट ऑफिस खात्याला पोस्टाच्या अल्पबचत खात्याशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

औषधे महागणार
१ एप्रिलपासून सामान्यांना लागणारी महत्त्वाची औषधे महाग होणार आहेत. महाग होणाऱ्या औषधांमध्ये ८०० औषधांचा समावेश आहे. औषधांच्या किमती ठरवणाऱ्या प्राधिकरणाने औषधांच्या किमती १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

वाहने महागणार
वाहन उत्पादक कंपन्या १ एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत. टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू, टोयोटा, मर्सिडीज, ऑडी या कंपन्या कारच्या किमतीत वाढ करणार आहेत. ही वाढ २ ते ४ टक्क्यांपर्यंत असणार आहे. मर्सिडीज बेंझने आपल्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिप्टोकरन्सीवर कर 
१ एप्रिलपासून सर्व प्रकराच्या डिजिटल मालमत्तांवर कर आकारण्यात येणार आहे. क्रिप्टोकरन्सीवरही ३० टक्के कर आकारण्यात येईल. तसेच ज्या वेळी क्रिप्टो मालमत्ता विकली जाईल त्या वेळी त्यावर १ टक्के टीडीएस कापला जाईल.

हे होणार स्वस्त
अर्थसंकल्प २०२२ मध्ये अनेक वस्तूंवर सीमा शुल्क, आयात शुल्क तसेच अनेक शुल्क वाढवणे आणि कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. 
यामुळे १ एप्रिलपासून कपडे, चामड्याचे सामान, मोबाइल फोन, चार्जर, हिरे, हिऱ्याचे दागिने, शेतीची अवजारे, पॉलिश केलेले हिरे, विदेशी मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वस्त होणार आहेत.

हे महागणार
छत्री, इमिटेशन ज्वेलरी, लाउडस्पिकर, हेडफोन, इअरफोन, सोलर सेल, एक्स रे मशीन, इलेक्ट्रॉनिक खेळणी महाग होणार आहेत.

महाराष्ट्रात सरकारने सीएनजीवर लागणारा वॅट कमी १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के केल्याने राज्यात सीएनजीच्या किमती कमी होणार आहेत. ५ ते ७ रुपये कमी दराने सीएनजी ग्राहकांना मिळेल.

Web Title: Big changes to come into effect from 1 April from medicine to cryptocurrency all you need know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.