lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bajaj कुटुंबाने मुंबईत खरेदी केले ५ 'सी व्ह्यू' फ्लॅट्स, किंमत ऐकून व्हाल अवाक्

Bajaj कुटुंबाने मुंबईत खरेदी केले ५ 'सी व्ह्यू' फ्लॅट्स, किंमत ऐकून व्हाल अवाक्

मुंबईत अरबी समुद्राजवळ आहे आलिशान इमारत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:06 AM2022-12-20T11:06:36+5:302022-12-20T11:12:02+5:30

मुंबईत अरबी समुद्राजवळ आहे आलिशान इमारत

Bajaj family buys 5 sea view flats in Mumbai the price will leave you speechless 104 crores rupees | Bajaj कुटुंबाने मुंबईत खरेदी केले ५ 'सी व्ह्यू' फ्लॅट्स, किंमत ऐकून व्हाल अवाक्

Bajaj कुटुंबाने मुंबईत खरेदी केले ५ 'सी व्ह्यू' फ्लॅट्स, किंमत ऐकून व्हाल अवाक्

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बड्या औद्याेगिक घराण्यांकडून लक्झरी घरांची खरेदी सुरूच आहे. प्रसिद्ध औद्याेगिक घराणे बजाजने मुंबईत पाच आलिशान सदनिका विकत घेतल्या आहेत. त्यांची एकूण किंमत तब्बल १०४ काेटी रुपये आहे. विशेष म्हणजे, सर्व सदनिका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत.

एका अहवालातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महालक्ष्मी परिसरातील ‘रहेजा व्हिवेरिया’च्या टाॅवर ई मध्ये या सदनिका आहेत. पाचपैकी दाेन सदनिका निर्वाण फॅमिली ट्रस्टतर्फे तर इतर सदनिका शेफाली बजाज, संजली बजाज आणि मनीष केजरीवाल यांनी खरेदी केल्या आहेत.

शेफाली या बजाज फिनसर्वच्या एमडी संजीव बजाज यांच्या पत्नी आहेत. अहवालानुसार, त्यांनी २८.३१ काेटी रुपयांची सर्वात महागडी सदनिका खरेदी केली आहे. ही सदनिका ३,४०० वर्ग फुटाची असून ३९ व्या मजल्यावर आहे. त्यांची मुलगी संजली यांनी ३८ व्या मजल्यावर त्याच बाजूची सदनिका खरेदी केली आहे. बजाज यांचे जावई केजरीवाल यांनी ३६ व्या माळ्यावर २,४३३ वर्गफुटाची सदनिका १५.४७ काेटी रुपयांत विकत घेतली आहे.

Web Title: Bajaj family buys 5 sea view flats in Mumbai the price will leave you speechless 104 crores rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.