Lokmat Money > बिझनेस न्यूज > आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ

आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ

Asha Bhosle sold Flat : याच आठवड्यात अभिनेता अक्षयकुमार याने मुंबईतील फ्लॅट विक्रीतून ७ कोटींचा नफा कमावला होता. आता या यादीत ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:15 IST2025-08-01T16:13:50+5:302025-08-01T17:15:51+5:30

Asha Bhosle sold Flat : याच आठवड्यात अभिनेता अक्षयकुमार याने मुंबईतील फ्लॅट विक्रीतून ७ कोटींचा नफा कमावला होता. आता या यादीत ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

Asha Bhosale Sells Pune Flat for ₹6.15 Crore, Earns 42% Return in 12 Years | आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ

आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ

Asha Bhosle sold Flat : मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट त्याच्या उच्च किमतींसाठी नेहमीच चर्चेत असते, पण आता पुणेही यात मागे राहिलेलं नाही. पुण्यातही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार सर्रास होत आहेत, हे एका ताज्या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी पुण्यातील त्यांचा एक आलिशान फ्लॅट तब्बल ६ कोटी १५ लाख रुपयांना विकला आहे.

१२ वर्षांत ४२% परतावा!
सीआरई मॅट्रिक्स या संस्थेने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, आशा भोसले यांनी हा फ्लॅट फेब्रुवारी २०१३ मध्ये ४ कोटी ३३ लाख रुपयांना खरेदी केला होता. याचा अर्थ, १२ वर्षांच्या या गुंतवणुकीवर त्यांना जवळपास ४२ टक्के परतावा मिळाला आहे, जो मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटलाही टक्कर देतो.

फ्लॅट मगरपट्टा परिसरात, IT कंपन्यांच्या जवळ
हा फ्लॅट पुण्यातील मगरपट्टा सिटीजवळील पंचशील वन नॉर्थ या इमारतीत आहे. हे अपार्टमेंट ३,४०१ चौरस फूट क्षेत्रफळाचे असून, त्यात १८२ चौरस फुटांचा टेरेस आणि पाच पार्किंग लॉट्सचा समावेश आहे. हा व्यवहार १४ जुलै २०२५ रोजी नोंदणीकृत करण्यात आला, ज्यासाठी ४३ लाखाहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले.

हा फ्लॅट १९ व्या मजल्यावर असून, तो पुण्यातील गायकवाड कुटुंबाने विकत घेतला आहे. ही इमारत पुणे विमानतळ, खराडी आणि हिंजवडीसारख्या आयटी हबपासून जवळ आहे, ज्यामुळे या भागाला मोठी मागणी आहे.

वाचा - जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?

पुण्यात रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी वाढ
या घटनेवरून हे स्पष्ट होतं की, मुंबईप्रमाणेच पुण्यातही रिअल इस्टेटची बाजारपेठ खूप वेगाने वाढत आहे. विशेषतः मगरपट्टा, खराडी आणि हिंजवडीसारख्या आयटी कंपन्यांच्या जवळच्या परिसरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत. गेल्या काही वर्षांत पुण्यात नोकरीच्या संधी वाढल्यामुळे आणि जीवनशैली अधिक चांगली असल्यामुळे, देशभरातील लोक इथे स्थायिक होत आहेत. त्यामुळे, पुण्यातील आलिशान घरांची मागणी वाढली असून, गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यताही वाढली आहे.

Web Title: Asha Bhosale Sells Pune Flat for ₹6.15 Crore, Earns 42% Return in 12 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.