Air India Express PayDay Sale: हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपली मासिक ‘पे-डे सेल’ सुरू केली असून, या अंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांसाठी तिकीटांचे दर कमी करण्यात आले आहेत.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत उड्डाणांची तिकीटे ₹1,950 पासून, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तिकीटे ₹5,590 पासून बुक करता येणार आहेत.
‘लाइट फेअर’चा पर्याय; कमी सामानासह स्वस्त प्रवास
कमी सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कंपनीने ‘लाइट फेअर’ हा विशेष पर्याय सादर केला आहे. या फेअरमध्ये चेक-इन बॅगेज समाविष्ट नसेल.
लाइट फेअरअंतर्गत
देशांतर्गत तिकीट: ₹1,850 पासून
आंतरराष्ट्रीय तिकीट: ₹5,355 पासून
बुकिंग आणि प्रवासाची वैधता
या सवलतीच्या तिकीटांची बुकिंग 1 जानेवारी 2026 पर्यंत करता येईल.
बुकिंगसाठी एअर इंडिया एक्सप्रेसची अधिकृत वेबसाइट, मोबाइल अॅप आणि इतर प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करता येईल.
देशांतर्गत उड्डाणे: 12 जानेवारी 2026 ते 10 ऑक्टोबर 2026
आंतरराष्ट्रीय उड्डाणे: 12 जानेवारी 2026 ते 31 ऑक्टोबर 2026
अतिरिक्त सुविधा; अॅप बुकिंगवर शुल्क माफ
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने काही अतिरिक्त सवलतीही जाहीर केल्या आहेत. यात...
मोबाइल अॅपवर तिकीट बुकिंग केल्यास कन्व्हिनियन्स चार्ज नाही
वेबसाइटवर नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
लाइट फेअर प्रवाशांसाठी बॅगेज सुविधा
लाइट फेअर निवडणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरात चेक-इन बॅगेजची सुविधा देण्यात येणार आहे:
देशांतर्गत उड्डाणे:
15 किलोपर्यंत बॅगेज – ₹1,500
आंतरराष्ट्रीय उड्डाणे:
20 किलोपर्यंत बॅगेज – ₹2,500
