Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनपा हद्दीत दलित वस्तीच्या 9़80 कोटींच्या कामांना मंजुरी

मनपा हद्दीत दलित वस्तीच्या 9़80 कोटींच्या कामांना मंजुरी

सोलापूर: महापालिका हद्दीत सन 2014-15 आणि सन 2015-16 या वर्षांतील अनुक्रमे 2़93 कोटी आणि 6़87 कोटी अशा एकूण 9़80 कोटींच्या दलित वस्तीतील कामांना मंजुरी देण्यात आली़

By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30

सोलापूर: महापालिका हद्दीत सन 2014-15 आणि सन 2015-16 या वर्षांतील अनुक्रमे 2़93 कोटी आणि 6़87 कोटी अशा एकूण 9़80 कोटींच्या दलित वस्तीतील कामांना मंजुरी देण्यात आली़

9 8 crores of Dalit population approved for work in NMC | मनपा हद्दीत दलित वस्तीच्या 9़80 कोटींच्या कामांना मंजुरी

मनपा हद्दीत दलित वस्तीच्या 9़80 कोटींच्या कामांना मंजुरी

लापूर: महापालिका हद्दीत सन 2014-15 आणि सन 2015-16 या वर्षांतील अनुक्रमे 2़93 कोटी आणि 6़87 कोटी अशा एकूण 9़80 कोटींच्या दलित वस्तीतील कामांना मंजुरी देण्यात आली़
नागरी दलित वस्ती जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त विजय काळम-पाटील, नगरपालिका विभागीय प्रशासनाधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील आदी उपस्थित होत़े
या बैठकीत मनपा क्षेत्रातील दलित वस्तीमध्ये पाच वर्षे रस्ता न खोदण्याच्या अटीवर विविध कामांना मंजुरी देण्यात आली़ शहराप्रमाणेच जिल्?ातील अक्कलकोट, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळा या नगरपालिकांच्या सुमारे 7 कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली़ ज्या नगरपालिकांनी प्रस्ताव दिले नाहीत त्यांनी एक महिन्याच्या आत प्रस्ताव द्यावेत अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या़ या बैठकीला विविध नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, मनपाचे व नगरपरिषदांचे अभियंता उपस्थित होत़े

फोटो ओळी़़़
04 डिजी 01
नागरी दलित वस्ती जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख़ यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त विजय काळम-पाटील, नगरपालिका विभागीय प्रशासनाधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील आदी ़

Web Title: 9 8 crores of Dalit population approved for work in NMC