lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘या’ कंपनीच्या ८ हजार नोकऱ्या आल्या संकटात

‘या’ कंपनीच्या ८ हजार नोकऱ्या आल्या संकटात

Job Loss: डेटा प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत ‘सॅप’ या जर्मन कंपनीने २०२४ या वर्षात पुनर्रचना करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी काही कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप बदलेल किंवा त्यांना भरपाई देऊन स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सांगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 05:37 AM2024-01-29T05:37:02+5:302024-01-29T05:37:27+5:30

Job Loss: डेटा प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत ‘सॅप’ या जर्मन कंपनीने २०२४ या वर्षात पुनर्रचना करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी काही कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप बदलेल किंवा त्यांना भरपाई देऊन स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सांगणार आहे.

8000 jobs of this company are in crisis | ‘या’ कंपनीच्या ८ हजार नोकऱ्या आल्या संकटात

‘या’ कंपनीच्या ८ हजार नोकऱ्या आल्या संकटात

नवी दिल्ली - डेटा प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत ‘सॅप’ या जर्मन कंपनीने २०२४ या वर्षात पुनर्रचना करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी काही कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप बदलेल किंवा त्यांना भरपाई देऊन स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सांगणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. 
२०२३ च्या अखेरीपर्यंत कंपनीत १ लाख ८ हजार कर्मचारी होते. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ५ टक्के वाढ झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने कंपनीने बाजारात आणखी मजबुतीने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला भविष्यात क्लाऊड सेंट्रिक बनविण्यावर भर देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 8000 jobs of this company are in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी