Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सने ओलांडला २३ हजाराचा निर्देशांक

सेन्सेक्सने ओलांडला २३ हजाराचा निर्देशांक

मुंबई शेअर बाजाराने आज २३, ०३७ चा टप्पा ओलांडल्याने गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाची लाट आहे. शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारातील निर्देशांकात तब्बल ६५० अंशांनी वाढ झाली आहे.

By admin | Updated: May 9, 2014 19:31 IST2014-05-09T18:50:16+5:302014-05-09T19:31:34+5:30

मुंबई शेअर बाजाराने आज २३, ०३७ चा टप्पा ओलांडल्याने गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाची लाट आहे. शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारातील निर्देशांकात तब्बल ६५० अंशांनी वाढ झाली आहे.

23 thousand indexes crossed the Sensex | सेन्सेक्सने ओलांडला २३ हजाराचा निर्देशांक

सेन्सेक्सने ओलांडला २३ हजाराचा निर्देशांक

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर होऊ शकणा-या बदलाचा परिणाम अर्थविश्वावरही होताना दिसत असून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने २३ हजारांपार उसळी मारत आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये ६५० अकांची विक्रमी वाढ होऊन तो २३ हजारांपार पोचला मात्र बाजार बंद होताना तो २२ हजार ९९४ वर येऊन थांबला. सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफटी या निर्देशांकातही १९८ अंकांची वाढ होऊन तो ६ हजार ८५८ वर पोला. 
शुक्रवारी सकाळी बाजाराचे कामकाज सुरू होताच बांधकाम, कॅपीटल मार्केट, बँकिंग व ऊर्जाक्षेत्रातील शेअर्सच्या व्यवहारात विक्रमी नोंद झाल्याने शेअर बाजाराने झेप घेतली. गुंतवणुकदारांनीही  आयसीआयसीआयसह इतर महत्वाच्या कंपन्यांच्या शेअर्सना खरेदीसाठी पसंती दिली. त्यात तेल, गॅस धातू व  आयटीच्या शेअर्सचाही समावेश आहे. 
येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून देश- विदेशातील गुंतवणुकदार बाजारावर सतर्कतेने लक्ष ठेऊन आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्सने मध्ये विक्रमी वाढ दिसून आली. यापुर्वी २५ एप्रिल रोजी सेन्सेक्सने २२ हजार ९३९ इतका विक्रमी आकडा नोंदवला होता.  

Web Title: 23 thousand indexes crossed the Sensex