lokmat Supervote 2024
Lokmat Money >म्युच्युअल फंड > Investment SIP : २० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक

Investment SIP : २० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक

पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. तुम्ही वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:11 AM2023-09-13T11:11:02+5:302023-09-13T11:11:23+5:30

पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. तुम्ही वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता.

You can become a millionaire in 20 years see how much you need to invest in SIP every month mutual funds | Investment SIP : २० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक

Investment SIP : २० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक

SIP Investment : सध्याच्या जीवनशैलीवर नजर टाकली तर कोट्यधीश बनणं हे आता स्वप्न राहिलेलं नाही तर, काळाची गरज बनली आहे. तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असेल आणि तुमच्या सर्व गरजा कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला आजपासूनच योजना तयार करावी लागेल. म्हणजेच तुम्ही पुढच्या २० वर्षानंतर कोट्यधीश बनू शकता. पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. तुम्ही वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता.

आजच्या काळात, SIP हे गुंतवणुकीचं साधन बनलं आहे, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती स्वतःला सहजपणं कोट्यधीश बनवू शकते. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाते. बाजारपेठेशी जोडलेले असल्यामुळे त्यात जोखीम थोडी अधिक असते आणि परताव्याची कोणतीही हमीही नसते. परंतु तरीही, गेल्या काही वर्षांत, एसआयपीनं सरासरी १२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत, कोणतीही व्यक्ती दीर्घकालीन गुंतवणूक करून चांगली रक्कम तयार करू शकते.

किती करावी लागेल गुंतवणूक
जर तुम्हाला येत्या २० वर्षात कोट्यधीश व्हायचं असेल, तर तुम्हाला दीर्घ काळासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतवले तर तुम्ही २० वर्षात स्वतःला सहजपणे कोट्यधीश बनवू शकता. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही २० वर्षे सतत १० हजार रुपये जमा केल्यास, तुमची एकूण गुंतवणूक २४,००,००० रुपये होईल. परं यावर १२ टक्के दरानं तुम्हाला ७५,९१,४७९ रुपये रिटर्न मिळतील. यानुसार, तुम्हाला ९९,९१,४७९ रुपये म्हणजेच मॅच्युरिटीवर अंदाजे १ कोटी रुपये मिळतील.

तुम्ही ही गुंतवणूक आणखी ५ वर्षे चालू ठेवल्यास तुम्हाला एसआयपीद्वारे १,८९,७६,३५१ रुपये मिळू शकतात. एसआयपीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न वाढल्यास, तुम्ही त्यात गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता आणि जास्तीत जास्त लाभ मिळवू शकता. याशिवाय ते कधीही बंद करता येते. तुम्ही एसआयपीमध्ये जितका जास्त वेळ पैसे गुंतवता तितका चांगला नफा तुम्हाला मिळतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: You can become a millionaire in 20 years see how much you need to invest in SIP every month mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.