lokmat Supervote 2024
Lokmat Money >म्युच्युअल फंड > Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'

Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'

Mutual Funds: या प्रकारात जे गुंतवणूक करतात त्यांची रक्कम लार्ज, मिडीयम आणि स्मॉल अशा तीनही कॅपमधील कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 26, 2023 12:26 PM2023-12-26T12:26:21+5:302023-12-26T12:29:22+5:30

Mutual Funds: या प्रकारात जे गुंतवणूक करतात त्यांची रक्कम लार्ज, मिडीयम आणि स्मॉल अशा तीनही कॅपमधील कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.

Mutual Fund Investment: Lets know about small cap mutual funds and flexi cap mutual funds | Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'

Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स
ज्या कंपन्यांचे भाग भांडवल रुपये पाच हजार कोटीपेक्षा कमी असते, अशा कंपन्या स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये मोडतात. लिस्टेड कंपन्या रँक मध्ये या स्मॉल कॅप कंपन्यांचा क्रम २५१ ते ५०० असा असतो. भाग भांडवल कमी असल्याने स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर बाजारात एकूण शेअर्स कमी असतात. यामुळे अशा शेअरचे भाव कधी एकतर्फी वर, तर कधी एकतर्फी खाली येऊ शकतात. हे त्या त्या कंपन्यांच्या व्यावसायिक कामगिरीवर अवलंबून असते. म्हणूनच स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुलनेत रिस्क अधिक असते.

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सचे  रिटर्न्स

मागील १ वर्ष  - १० ते ३४ टक्के
मागील ३ वर्षं -  २८ ते ४२ टक्के
मागील ५  वर्षं - १४ ते २८ टक्के
मागील १० वर्षे - १७ ते २७ टक्के

हेही वाचाः भाग १
Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडा

हेही वाचाः भाग २
म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आणि कोणते?; कुणामार्फत गुंतवता येतात पैसे?... जाणून घ्या

फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड :
या प्रकारात जे गुंतवणूक करतात त्यांची रक्कम लार्ज, मिडीयम आणि स्मॉल अशा तीनही कॅपमधील कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. सेबी नियमानुसार प्रत्येक कॅपमधील कंपन्यांचे प्रमाणात ठरवून त्यानुसार गुंतवणूक विभागली जाते. जेव्हा शेअर बाजारात सर्वांगाने तेजी असते अशा परिस्थितीत तीनही कॅपमधील परतावा उत्तम राहतो. परंतु, कधी कधी स्मॉल कॅपमध्ये मंदी, तर कधी मिड किंवा लार्ज कॅपमध्ये मंदी अशा परिस्थितीत सर्वसाधारण परतावा ठीकठाक राहतो. गुंतवणुकीतील जोखीम विभागून असावी असे ज्यांना वाटते, अशा गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्स एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचाः भाग ३ 
म्युच्युअल फंडचा राजा 'इक्विटी फंड'; यात कसे मिळतात जास्तीत जास्त 'रिटर्न्स'?

हेही वाचाः भाग ४
आधे इधर, आधे उधर... बड्या कंपन्यांचे शेअर पडले, तरी गुंतवणूक 'सेफ' ठेवणारा फंडा!

फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स

मागील १ वर्ष  - ७ ते २४ टक्के
मागील ३ वर्षं -  १३ ते ३२ टक्के
मागील ५  वर्षं - १२ ते २३ टक्के
मागील १० वर्षे - १६ ते २२ टक्के
(स्रोत : ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन संकेतस्थळ)

गुंतवणूकदारांनी कृपया नोंद घ्यावी की म्युचअल फंड मधील परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात. कोरोना पश्चात शेअर बाजार एकतर्फा वाढला यामुळे तीन वर्षांतील रिटर्न्स सर्वोत्तम दिसत आहेत. विविध कॅप मधील फंड्स मध्येही असे आवर्जून निदर्शनास येते.
 
पुढील भागात ईएलएसएस आणि व्हॅल्यू फंडविषयी ....
 

Web Title: Mutual Fund Investment: Lets know about small cap mutual funds and flexi cap mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.