lokmat Supervote 2024
Lokmat Money >म्युच्युअल फंड > फंड जोखमीचं मूल्यमापन करण्यासाठी रिस्क-ओ-मीटर कसं वापरावं

फंड जोखमीचं मूल्यमापन करण्यासाठी रिस्क-ओ-मीटर कसं वापरावं

म्युच्युअल फंड सध्या गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहेत. अशातच सेबीनं गुंतवणूकदारांना माहिती आणि मदत व्हावी यासाठी विविध साधनं, इंडिकेटर्स सादर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 01:38 PM2023-10-10T13:38:09+5:302023-10-10T13:39:39+5:30

म्युच्युअल फंड सध्या गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहेत. अशातच सेबीनं गुंतवणूकदारांना माहिती आणि मदत व्हावी यासाठी विविध साधनं, इंडिकेटर्स सादर केले आहेत.

How to use Risk O Meter to assess fund risk investment axis bank mutual fund | फंड जोखमीचं मूल्यमापन करण्यासाठी रिस्क-ओ-मीटर कसं वापरावं

फंड जोखमीचं मूल्यमापन करण्यासाठी रिस्क-ओ-मीटर कसं वापरावं

म्युच्युअल फंड सध्या गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहेत. बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे सेबी. सेबीनं गुंतवणूकदारांना माहिती आणि मदत व्हावी यासाठी विविध साधनं, इंडिकेटर्स सादर केले आहेत. यापैकीच एक म्हणजे रिस्कओमिटर (''Riskometer).'' साध्या आणि सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जोखमीचं मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेलं हे महत्त्वाचं साधन आहे. तुमच्या वाहनाचं जसं स्पीडोमीटर असतं अगदी तसंच हे रिस्कओमिटर असतं. तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या फंडामध्ये किती जोखीम तुम्हाला पत्करावी लागू शकते हे यातून तुम्हाला कळू शकतं.

लो रिस्क (Low risk): लो रिस्कमध्ये असलेल्या फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार त्यांची गुंतवलेलेल्या रक्कमेवर कमी जोखीम पत्करावी लागू शकते अशी अपेक्षा करू शकतात. ज्या गुंतवणूकदारांना कमी जोखीम घ्यायची आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी यातील गुंतवणूक योग्य ठरू शकते.  

लो मॉडरेट रिस्क (Low to moderate risk) : लो मॉडरेट रिस्क असं वर्गीकरण करण्यात आलेल्या फंडामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आपल्या रकमेवर बाजारातील किमान जोखील असण्याची अपेक्षा करू शकतात. कन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर्ससाठी हे फंड्स उपयुक्त ठरू शकतात.

मॉडरेट रिस्क (Moderate Risk) : ज्या गुंतवणूकदारांची मोठा फंड तयार करण्यासाठी मर्यादित जोखीम पत्करण्याची तयारी असते, अशा सेमी-कन्झर्व्हेटिव्ह गुंतवणूकदारांसाठी मॉडरेट रिस्क फंड उपयुक्त ठरू शकतात. ज्यांना ३ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करायची आहे अशा मध्यम आणि दीर्घकालिन गुंतवणूकदारांसाठी हे फंड्स योग्य ठरू शकतात.

हाय रिस्क (High risk) : ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ परंतु ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी हा फंड योग्य ठरू शकतो. यामध्ये गुंतवलेल्या रकमेला उच्च जोखीम आणि उच्च बाजारातील अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो.

वेरी हाय रिस्क (Very High Risk) : या स्कीम्स प्रामुख्याने जास्त अस्थिर स्टॉक्स असलेल्या आणि इतर फंडांच्या तुलनेत उच्च जोखीम प्रोफाइल असलेल्या इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. अतिशय आक्रमक गुंतवणूकदारांसाठी हे श्रेणी योग्य ठरू शकते. फंडांच्या या श्रेणीमध्ये सेक्टरल,थिमॅटिक, इंटरनॅशनल, मिडकॅप, स्मॉल फंडांचा समावेश होतो.

आजच्या काळात गुंतवणूकदार माहितीपूर्ण निर्णय घेण्यास योग्य आहेत. ज्या वेळी इक्विटी मार्केट अस्थिर असतात, त्या वेळी गुंतवणूकदारांसाठी रिस्कोमीटरची ओळख आणि माहिती महत्त्वाची असते. हे पूर्वीच्या रिस्कओमिटरच्या तुलनेत बदल करत आणण्यात आलेलं रिस्कओमिटर आहे, ज्या ठिकाणी रिस्क ग्रेड ही मूळ अंडलाइंग होल्डिंग फंडवर आधारित असते.

म्युच्युअल फंडाची व्याप्ती अतिशय मोठी आहे आणि यात अनेक फंड्स आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या क्षमतेनुसार किती जोखीम पत्करता येईल त्या स्कीम्स निवडण्यासाठी या रिस्कओमिटरचा वापर करता येऊ शकतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडानं यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये कोणत्याही फंडाचं जोखिमीच्या विविध स्तरांतर्गत वर्गीकरण करण्यात येणार असल्याचा समावेश आहे.

गुंतवणूकदार आपल्या वैयक्तित जोखमीचं विश्लेषण करण्यासाठी रिस्क प्रोफाईलरचा कसा वापर करू शकतात?

गुंतवणुकीचे लोकप्रिय साधन असलं तरी म्युच्युअल फंड स्कीम्स त्यांच्या स्वतःच्या जोखमींसह देखील येतात. दरम्यान, कोणीही रिस्क प्रोफाईलरद्वारे त्यांच्या वैयक्तिक जोखमींचं मूल्यांकन करू शकतात.

जोखीम प्रोफाइलर नावाच्या साधनाद्वारे त्यांच्या वैयक्तिक जोखमीचे मूल्यांकन करू शकतो. रिस्क प्रोफाईलर एखाद्या व्यक्तीची त्याच्या/तिच्या आर्थिक बाबतीत जोखीम घेण्याची क्षमता दर्शवतो. एखाद्याच्या जोखमीच्या पलीकडे गुंतवणूक करणं एखाद्या व्यक्तीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओसाठी घातक ठरू शकतं.

शिवाय, गुंतवणूकदार त्यांच्या वैयक्तिक जोखमीचं विश्लेषण करण्यासाठी रिस्क प्रोफाईलर वापरू शकतात. रिस्क प्रोफाईल एखाद्या व्यक्तीनं तयार केलेल्या आणि स्वीकारण्यास सक्षम असलेल्या धोक्याची पातळी ओळखते. जेव्हा गुंतवणुकीपूर्वी तुमची रिस्क प्रोफाइल अपडेट केली जाते, तेव्हा ते तुम्हाला तसेच तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला तुमच्या रिस्क प्रोफाइलशी संबंधित विशिष्ट असेट्स निवडण्यास मदत करते. रिस्क प्रोफाइल गुंतवणूकदाराला कोणकोणत्या संभाव्य धोक्यांचा सामना करावा लागू शकतो हे निश्चित करण्यात मदत करते. तुमच्या जोखीम प्रोफाइलची ओळख, येऊ घातलेले नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी पावलं उचलण्यात याद्वारे मदत होते.

एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या कष्टानं कमावलेला पैसा कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवतो, तेव्हा रिस्कओमिटर तशा योजनेतील जोखमीची पातळी मोजण्यास मदत करतो. तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की केवळ रिस्कओमिटर योग्य उत्पादन निवडण्यास मदत करणार नाही, तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार ब्रॉड फंड श्रेणीची निवड करणं ही केवळ पहिली पायरी आहे. एखाद्या व्यक्तीनं फंडाच्या जोखमीचं वैयक्तिक जोखमीशी तुलना केली पाहिजे आणि मोठा फंड तयार करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीपूर्वी त्यांची गुंतवणूक कोणत्या श्रेणीत येते याची पडताळणी केली पाहिजे.

हा ॲक्सिस म्युच्युअल फंडाचा गुंतवणूकदारांसाठी माहिती देणारा आणि जागरूकता निर्माण करणार उपक्रम आहे. गुंतवणूकदारांना वन टाईम केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

अधिक माहितीसाठी www.axismf.comया संकेतस्थळाला भेट द्या किंवा customerservice@axismf.com यावर संपर्क साधा. केवळ नोंदणीकृत म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. याची माहिती www.sebi.gov.in – Intermediaries/ Market Infrastructure Institutions section या ठिकाणी उपलब्ध आहे.

कोणत्याही तक्रार निवारणासाठी गुंतवणूकदारांनी 1800 221 322 या क्रमांकावर किंवा customerservice@axismf.com यावर संपर्क साधावा. याशिवायhttp://scores.gov.in या सेबीच्या पोर्टलवरही तक्रार दाखल करता येईल.

येथे उपलब्ध असलेली माहिती आणि मतांची अचूकता, पूर्णता किंवा निष्पक्षतेबाबत कोणतंही प्रतिनिधित्व अथवा हमी दिलेली नाही. यामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार एएमसी राखून ठेवतो.


वैधानिक तपशील- ॲक्सिस म्युच्युअल फंडाची स्थापना इंडियन ट्रस्ट ॲक्ट, १८८२ अंतर्गत ॲक्सिस बँक लिमिटेडनं प्रायोजित करून ट्रस्ट म्हणून केली आहे. विश्वस्त: Axis Mutual Fund Trustee Ltd. गुंतवणूक व्यवस्थापक: Axis Asset Management Co. Ltd. (the AMC). जोखमीचे घटक: या योजनेमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी ॲक्सिस बँक लिमिटेड उत्तरदायी किंवा जबाबदार राहणार नाही.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजनांशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Web Title: How to use Risk O Meter to assess fund risk investment axis bank mutual fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.