lokmat Supervote 2024
Lokmat Money >म्युच्युअल फंड > ५० हजार वेतन, त्यातून किती गुंतवणूक केल्यावर जमेल मोठा फंड? काय म्हणतो Financial Rule

५० हजार वेतन, त्यातून किती गुंतवणूक केल्यावर जमेल मोठा फंड? काय म्हणतो Financial Rule

तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 05:39 PM2023-09-23T17:39:23+5:302023-09-23T17:39:50+5:30

तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे.

50 thousand salary after how much investment a big fund What does the Financial Rule say mutual fund investment sip tips | ५० हजार वेतन, त्यातून किती गुंतवणूक केल्यावर जमेल मोठा फंड? काय म्हणतो Financial Rule

५० हजार वेतन, त्यातून किती गुंतवणूक केल्यावर जमेल मोठा फंड? काय म्हणतो Financial Rule

तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे. ही गुंतवणूकही तुमच्या उत्पन्नानुसार असावी. सामान्यतः लोक उत्पन्नानुसार गुंतवणूक करत नाही. छोटी गुंतवणूक भविष्यात फारशी उपयोगी ठरेलच असं नाही. आर्थिक तज्ज्ञ दीप्ती भार्गव यांच्या मते, उत्पन्नातील किती रक्कम खर्च करावी आणि किती बचत करून गुंतवणूक करावी, याचे काही आर्थिक नियम आहेत. जर तुम्ही हा नियम अवलंबलात तर तुम्हाला भविष्यात कधीही पैशाची समस्या भासणार नाही.

असा असावा नियम
तुमचं उत्पन्न कितीही असो. आर्थिक नियमांनुसार ते तीन भागात विभागलं पाहिजे. हा हिस्सा 50 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के असावेत. समजा तुमचं मासिक उत्पन्न 50,000 रुपये आहे. यामध्ये 50 टक्के 25,000 रुपये, 30 टक्के 15,000 रुपये आणि 20 टक्के 10,000 रुपये होतात. घरातील आवश्यक खर्च भागवण्यासाठी तुम्ही त्यातील 50 टक्के रक्कम ठेवावी. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामांसाठी किंवा तुमचे काही छंद पूर्ण करण्यासाठी तुम्ही 30 टक्के रक्कम ठेवू शकता. अशा प्रकारे, 80 टक्के पगार पूर्णपणे तुमचा आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार खर्च करू शकता.

20 टक्के रकमेची बचत करा आणि ती रक्कम गुंतवा. दरमहा 50,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीनं दरमहा किमान 10,000 रुपये गुंतवले पाहिजेत. जर तुमचं वय 25 वर्षे असेल आणि तुम्ही या गुंतवणूकीचा नियम 20 वर्षे सतत पाळला असेल, तर 20 वर्षांनंतर तुमच्याकडे चांगली रक्कम जमा होईल. जसजसा पगार वाढेल तसतसा 20 टक्के वाटाही वाढेल आणि वेळेनुसार गुंतवणूक वाढली तर वेल्थ क्रिएशनही चांगले होईल.

कसा तयार होईल मोठा फंड
आज, गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, परंतु एसआयपी हा एक अतिशय पसंतीचा पर्याय आहे. याचे कारण म्हणजे यात सरासरी 12 टक्के परतावा मिळालेला आहे. जो इतर कोणत्याही योजनेपेक्षा जास्त आहे. हा परतावा निश्चित नाही. बाजाराशी जोडलेले असल्यानं त्याचा बाजारातील चढउतारावर परिणाम होऊ शकतो.

तरीही, जर केवळ 10,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मोजला, तर तुम्ही 20 वर्षांसाठी SIP मध्ये दरमहा 10,000 गुंतवल्यास, तुम्ही एकूण 24,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. पण 12 टक्के दराने, 20 वर्षांत तुम्हाला 99,91,479 रुपये मिळतील, म्हणजे अंदाजे 1 कोटी रुपये मिळतील. यात तुम्हाला 75,91,479 रुपये व्याजाच्या रुपात मिळतील.

...तरच जमा होईल फंड
जर तुम्ही 20 वर्षांसाठी फक्त केवळ तितकीच रक्कम जमा करत असाल तर हे कॅलक्युलेशन तुमच्या कामी येईल. जर तुम्ही ही रक्कम वेळोवेळी वाढवत राहिलात आणि 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर तुम्ही 20 वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही SIP मध्ये निश्चित रक्कम गुंतवू शकता आणि उत्पन्न वाढल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे इतर योजनांमध्येही गुंतवू शकता. निर्णय तुमचा आहे, पण गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही हा आर्थिक नियम पाळलात, तर निवृत्तीच्या वयात तुम्हाला पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 50 thousand salary after how much investment a big fund What does the Financial Rule say mutual fund investment sip tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.