Mukesh Ambani: Reliance Industries Plans Global Payments Play Via NUE | Mukesh Ambani: Visa आणि Master Card ला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानींची खेळी; RIL चा डाव यशस्वी होणार?

Mukesh Ambani: Visa आणि Master Card ला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानींची खेळी; RIL चा डाव यशस्वी होणार?

ठळक मुद्देरिलायन्स इंडस्ट्रीजनं NUE सोबत लॉन्ग टर्म प्लॅन बनवण्यास सुरूवात केली आहेरिलायन्स, इन्फीबीम एवेन्यू, फेसबुक आणि गुगल या दिग्गज कंपन्या एकत्रित आल्याअलीकडच्या काही वर्षात डिजिटल व्यवहारांमध्ये भारत दिवसेंदिवस प्रगती करत आहे.

नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीज(RIL) ने पेमेंट सर्व्हिससाठी न्यू अंब्रैला एंटिटीला प्रस्ताव दिला आहे, इन्फीबीम एवेन्यू, गुगल आणि फेसबुक यांच्यासोबत एकत्रिकरण असेल, NUE च्या माध्यमातून रिलायन्स ग्लोबल पेमेंट्स कंपनीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, NUE च्या माध्यमातून परदेशी पेमेंट्स सर्व्हिस देण्याची योजना आखत आहे.

जर रिलायन्स कंपनीला यासाठी ऑपरेटिंग लायसन्स मिळालं तर काही महिन्यात मार्केटमध्ये वीजा आणि मास्करकार्ड सारख्या दिग्गजांना धक्का बसेल. सूत्रांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजनं NUE सोबत लॉन्ग टर्म प्लॅन बनवण्यास सुरूवात केली आहे. NUE सह आरआयएल यूनिट, इन्फीबीम एवेन्यू, फेसबुक आणि गुगल मिळून प्रसार करतील. RIL ची यात ४० टक्के भागेदारी असू शकते, तर बाकी तीन कंपन्यांची मिळून २०-२० टक्के भागीदारी असेल.

या चारही कंपन्यांनी एकत्र येत NUE कडे परवाना मिळवण्यासाठी मागील आठवड्यात अर्ज केला आहे. NUE द्वारे लायसन्स मिळाल्यानंतर या चारही कंपन्यांनी बनवलेली एंटिटी भारताच्या डिजिटल पेमेंट्स प्रोसेसिंगमध्ये सक्षमपणे उभी राहणार आहे, NUE डिजिटल व्यवहारांसाठी एक व्यासपीठ आहे, अलीकडच्या काही वर्षात डिजिटल व्यवहारांमध्ये भारत दिवसेंदिवस प्रगती करत आहे. जास्तीत जास्त NUE पेमेंट्स नेटवर्क वेगवान डिजिटल व्यवहारांना चालना देईल अशी भारतीय रिझर्व्ह बँकेला अपेक्षा आहे. मागील बुधवारी ६ कंपन्यांनी डिजिटल व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज सोपवले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mukesh Ambani: Reliance Industries Plans Global Payments Play Via NUE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.