Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Gas price hike: चार दिवसांत पुन्हा गॅस सिंलिंडरची दरवाढ, पाहा काय आहेत नवे दर

LPG Gas price hike: चार दिवसांत पुन्हा गॅस सिंलिंडरची दरवाढ, पाहा काय आहेत नवे दर

LPG Gas price hike: चार दिवसांत गॅस सिंडरच्या दरात झाली ५० रूपयांची दरवाढ, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:32 AM2021-03-01T10:32:45+5:302021-03-01T10:35:02+5:30

LPG Gas price hike: चार दिवसांत गॅस सिंडरच्या दरात झाली ५० रूपयांची दरवाढ, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांचा झटका

LPG cylinder price today Cooking gas gets costlier by Rupees 25 second hike in four days check new prices | LPG Gas price hike: चार दिवसांत पुन्हा गॅस सिंलिंडरची दरवाढ, पाहा काय आहेत नवे दर

LPG Gas price hike: चार दिवसांत पुन्हा गॅस सिंलिंडरची दरवाढ, पाहा काय आहेत नवे दर

Highlightsचार दिवसांत गॅस सिंडरच्या दरात झाली ५० रूपयांची दरवाढमार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांचा झटका

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्यानं वाढत आहेत. पेट्रोलनं तर अनेक ठिकाणी शंभरी पार केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. असं असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे. पहिन्याभराच्या कालावधीत सिलिंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. आज (१ मार्च) सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ ढाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात १०० रूपयांची वाढ झाली होतीय यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी गॅसचे दर २५ रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रूपये, त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५० रूपयांची वाढ करण्यात आली होती. 

देशात पुन्हा एकदा विनाअनुदानीत सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर ७९४ रूपयांवरून वाढून ८१९ रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलिंडरचे नवे दर ८१९ रूपये, कोलकात्यात ८४५.५० रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता ८३५ रूपये झाले आहेत. जानेवारी महिन्यात कंपन्यांनी या दरात कोणतेही बदल केले नवते परंतु फेब्रुवारी महिन्यात सलग तीनदा हे दर वाढवण्यात आले.

१९ किलोच्या सिलिंडरचे दर

१९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ९०.५० रूपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता या सिलिंडरची किंमत १६१४ रूपये झाली आहे. यापूर्वी हे दर १५२३.५० रूपये इतके होते. त्याचप्रमाणे मुंबईतही हे दर १५६३.५० रूपये आणि कोलकात्यात १६८१.५० आणि चेन्नईत हे दर १७३०.५० रूपये इतके झाले आहेत. गॅसचे नवे दर पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी इंधन कंपन्यांच्या संकेतस्थळावरही माहिती मिळू शकते. या ठिकाणी इंधन कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करत असते.  https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला गॅस सिलिंडरचे नवे दर पाहता येऊ शकतात. 

 

Web Title: LPG cylinder price today Cooking gas gets costlier by Rupees 25 second hike in four days check new prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.