lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO GMP : लिस्टिंगपूर्वीच ‘इतका’ पडला एलआयसीचा ग्रे मार्केट प्रीमिअम, गुंतवणूकदारांना होणार नुकसान

LIC IPO GMP : लिस्टिंगपूर्वीच ‘इतका’ पडला एलआयसीचा ग्रे मार्केट प्रीमिअम, गुंतवणूकदारांना होणार नुकसान

LIC IPO GMP : BSE, NSE वर डिस्काऊंट लिस्टिंग झाल्यासही एलआयसीचं मार्केट कॅप ६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक राहण्याचे संकेत मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:07 PM2022-05-16T12:07:32+5:302022-05-16T12:08:21+5:30

LIC IPO GMP : BSE, NSE वर डिस्काऊंट लिस्टिंग झाल्यासही एलआयसीचं मार्केट कॅप ६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक राहण्याचे संकेत मिळत आहेत.

lic ipo news listing gmp falls further listing date price shareholders may loose money on debut day other details | LIC IPO GMP : लिस्टिंगपूर्वीच ‘इतका’ पडला एलआयसीचा ग्रे मार्केट प्रीमिअम, गुंतवणूकदारांना होणार नुकसान

LIC IPO GMP : लिस्टिंगपूर्वीच ‘इतका’ पडला एलआयसीचा ग्रे मार्केट प्रीमिअम, गुंतवणूकदारांना होणार नुकसान

LIC IPO GMP : एलआयसीचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरला होता. यानंतर आता मंगळवारी कंपनीचे शेअर्स शेअर बाजारावर (Stock market) वर लिस्ट होणार आहेत. रेकॉर्ड ६ दिवस सुरू राहिल्यानंतर एलआयसीच्या आयपीओला उत्तम प्रतिसाग मिळाला होता. गेल्या आठवड्यातच गुंतवणूकदारांना शेअर्स अलॉटही करण्यात आले. ज्यांना हे शेअर्स अलॉट झाले आहेत, त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये आज हे शेअर्स जमा होतील. परंतु आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांसाठी मात्र एक गोष्ट डोकेदुखी ठरू शकते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओचा प्रीमिअम लिस्टिंगपूर्वीच आणखी पडला आहे. यावरून हे शेअर डिस्काऊंटेड प्राईजमध्ये लिस्ट होण्याचेही संकेत मिळत आहेत.

लिस्टिंगच्या एक दिवस आधीच म्हणजेच सोमवारी एलआयसीच्या आयपीओचा जीएमपी निगेटिव्ह २५ रुपयांपर्यंत घसरला आहे. एक अशी वेळ होती जेव्हा हा ग्रे मार्केटमध्ये ९२ रूपयांच्या प्रीमिअमवर ट्रेड करत होता. टॉप शेअर ब्रोकर्सच्या आकडेवारीनुसार, आता एलआयसीचा आयपीओ ग्रे मार्केट प्रीमिअम निगेटिव्ह १५ रुपयांवर आहे. तर आयपीओ वॉचवर तो निगेटिव्ह २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यावरून गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी नुकसान सोसावं लागू शकतं असे संकेत मिळत आहेत.

पाचवी सर्वात मोठी कंपनी
बीएसई, एनएसईवर डिस्काऊंटेड लिस्टिंग झालं तरी एलआयसीचं मार्केट कॅप ६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक राहण्याचे संकेत मिळत आहेत. जर असं झालं, तर लिस्ट होताच ही भारतातील पाचवी सर्वात मोठी पब्लिक कंपनी ठरेल. मार्केट कॅपच्या हिशोबानं सरकारी विमा कंपनीच्या पुढे रिलायन्स इडस्ट्रिज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title: lic ipo news listing gmp falls further listing date price shareholders may loose money on debut day other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.