lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways : आता कधीच चुकणार नाही तुमची ट्रेन! जाणून घ्या रेल्वेचा हा खास नियम, IRCTC नं सांगितली पद्धत

Indian Railways : आता कधीच चुकणार नाही तुमची ट्रेन! जाणून घ्या रेल्वेचा हा खास नियम, IRCTC नं सांगितली पद्धत

प्रवाशाने बोर्डिंग स्टेशन न बदलता दुसर्‍या स्टेशनवरून ट्रेन पकडली, तर त्याला दंड भरावा लागेल. तसेच त्याच्याकडून बोर्डिंग पॉइंट ते सुधारित बोर्डिंग पॉइंटदरम्यानचे भाडेही वसूल केले जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:41 PM2022-01-25T15:41:45+5:302022-01-25T15:41:53+5:30

प्रवाशाने बोर्डिंग स्टेशन न बदलता दुसर्‍या स्टेशनवरून ट्रेन पकडली, तर त्याला दंड भरावा लागेल. तसेच त्याच्याकडून बोर्डिंग पॉइंट ते सुधारित बोर्डिंग पॉइंटदरम्यानचे भाडेही वसूल केले जाईल.

Indian railway IRCTC latest rule change your boarding station on online ticket know the process | Indian Railways : आता कधीच चुकणार नाही तुमची ट्रेन! जाणून घ्या रेल्वेचा हा खास नियम, IRCTC नं सांगितली पद्धत

Indian Railways : आता कधीच चुकणार नाही तुमची ट्रेन! जाणून घ्या रेल्वेचा हा खास नियम, IRCTC नं सांगितली पद्धत

नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत कामाची बातमी आहे. आपल्यावर अनेक वेळा मुख्य रेल्वे स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून रेल्वे पकडण्याची वेळ येते. मात्र, बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी आपल्याला आपल्या तिकिटात बदल करणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला दंड केला जाऊ शकतो. 

बुक केलेल्या तिकिटात बदलू शकता बोर्डिंग स्टेशन -
आपल्याला अनेक वेळा अचानकपणे बोर्डिंग स्टेशन बदलण्याचीही आवश्यकता पडते. जसे, बोर्डिंग स्टेशनपासून प्रवासी दूर असल्यास अनेकवेळा ट्रेन चुकण्याची भीती असते. यामुळे जर ट्रेन, प्रवाशाजवळील स्टेशनवर थांबत असेल तर प्रवासी आपले बोर्डिंग स्टेशन रिव्हाइज करू शकता.

प्रवाशांची ही गरज लक्षात घेऊन IRCTC बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देते. ही सुविधा, ज्या प्रवाशांनी ऑनलाइन पद्धतीने रेल्वेचे तिकिट बुक केले आहे, अशा सर्व प्रवाशांसाठी आहे. मात्र, ट्रॅव्हल एजन्ट्सकडून आणि पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमच्या माध्यमाने ज्यांनी तिकीट बुक केले आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, VIKALP ऑप्शनच्या PNRs मध्येही बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करता येणार नाही. 

ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी करावा लागेल बदल - 
ज्या प्रवाशांची आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची इच्छा आहे, त्यांना ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीच ऑनलाइन बदल करता येईल. पण IRCTC च्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रवाशाने एकदाका आपले बोर्डिंग स्टेशन बदलले, तर त्याला ओरिजनल बोर्डिंग स्टेशनपासून ट्रेन पकडता येणार नाही. 

महत्वाचे म्हणजे, प्रवाशाने बोर्डिंग स्टेशन न बदलता दुसर्‍या स्टेशनवरून ट्रेन पकडली, तर त्याला दंड भरावा लागेल. तसेच त्याच्याकडून बोर्डिंग पॉइंट ते सुधारित बोर्डिंग पॉइंटदरम्यानचे भाडेही वसूल केले जाईल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, IRCTC च्या नियमांनुसार - बोर्डिंग स्टेशनमध्ये केवळ एकदाच बदल केला जाऊ शकतो.

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सोपी पद्धत - 
1. सर्वप्रथम IRCTC ची आधिकारिक वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train-search वर जा. 
2. लॉग-इन आणि पासवर्ड टाका आणि नंतर ‘Booking Ticket History’ मध्ये जा. 
3. आपली ट्रेन सिलेक्ट करा आणि 'change boarding point' वर जा. 
4. एक नवे पेज ओपन होईल, ड्रॉप डाउनमध्ये त्या ट्रेनसाठी नवे बोर्डिंग स्टेशन निवडा. 
5. नवे स्टेशन निवडल्यानंतर सिस्टिम कंफर्मेशन मागेल. आता आपण 'OK'वर क्लिक करा. 
6. बोर्डिंग स्टेशन बदलल्यासंदर्भातील एक SMS आपल्या मोबाइलवर येईल.
 

Web Title: Indian railway IRCTC latest rule change your boarding station on online ticket know the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.