Indian Railway Finance Corporation IPO opens today Should you subscribe? see what experts says | Indian Railway Finance Corporation चा IPO झाला खुला; गुंतवणूक करावी का? 

Indian Railway Finance Corporation चा IPO झाला खुला; गुंतवणूक करावी का? 

ठळक मुद्देया वर्षात खुला झालेला हा पहिला IPO आहे.२० जानेवारीपर्यंत मिळणार गुंतवणूकदारांना संधी

सरकारीच्या इंडियन रेल्वे फायनॅन्स कॉर्पोरेशनचा (Indian Railway Finance Corporation) आयपीओ आज खुला झाला. पुढील दोन दिवस म्हमजेच २० जानेवारीपर्यंत हा आयपीओ खुला राहणार आहे. २०२१ या वर्षातील हा पहिला आयपीओ आहे. याच आठवड्याच्या अखेरिस Indigo Paints चा आयपीओदेखील खुला होणार आहे. IRFC चे लीड मॅनेजर्स DAM कॅपिटल्स अॅडव्हायझर्स, HSBC सिक्योरिटीज अँड कॅपिटल मार्केट इंडिया, ICICI सिक्योरिटीज आणि SBI कॅपिटल्स हे आहेत.

IRFC IPO मध्ये एकून १७८.२० कोटी रूपयांचे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये ११८.८० कोटी रूपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जाणार आहेत. तर ५९.४० कोटी रूपयांच्या शेअर्सची भारत सरकार OFS (ऑफर फॉर सेल) द्वारे विक्री करणार आहे. IRFC च्या शेअर्सची इश्यू प्राईज २५-२६ रुपये प्रति शेअर असणार आहे. यामध्ये  १, ७८२,०६९,००० इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. विक्रीमध्ये एकूण १, १८८,०४६,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि ५९४, ०२३,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. तर दुसरीकडे पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक ५ लाख रूपयांपर्यंत शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. या आयपीओनंतर सरकारचा या कंपनीतील हिस्सा कमी होऊन तो ८६.४ टक्के इतका राहणार आहे.

गुतवणूक करावी का?

चॉईस ब्रोकिंगनं या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घ कालावधीसाठी हा आयपीओ उत्तम आहे. तर दुसरीकडे माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सॅम्को सिक्योरिटीजच्या सीनिअर रिसर्च अॅनालिसिस्ट निराली शाह यांनी IRFC आणि इंडिगो पेन्ट्स हे २०२१ या वर्षातील महत्त्वाचे आयपीओ आहेत. यानंतर बाजारात अन्य आयपीओ येतील अशी अपेक्षाही वर्तवण्यात येत आहे. बाजारात होत असलेल्या गुंतवणुकीचा फायदा IPO आणि FPO ला मिळत असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसंच ही एक उत्तम संधी असून आयपीओमध्ये खरेदी करा आणि संधी मिळाल्यावर नफा कमवा, असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

IRFC नं अँकर गुंतवणुकदारांकडून १,३९० कोटी रूपये मिळवले आहेत. IRFC ची स्थापना १९८६ मध्ये झाली होती. IRFC भारतीयरेल्वेसाठी देशांतर्गत आणि परदेशी बाजारातून भांडवलं जमा करण्याचं काम करते. याव्यतिरिक्त यानंतर इंडिगो पेन्ट्सचाही आयपीओ बाजारात येणार आहे. ती कंपनी पुण्यातल रंग तयार करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा संपूर्ण देशात विस्ता आहे. कंपनीकडे राजस्थान, केरल आणि तामिळनाडूमध्ये उत्पादन ३ उत्पादन प्रकल्पही आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indian Railway Finance Corporation IPO opens today Should you subscribe? see what experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.