lokmat Supervote 2024
Lokmat Money >आयकर > अलर्ट! ३० जानेवारीपूर्वी उरकून घ्या 'इन्कम टॅक्स'शी निगडीत 'हे' काम, नाहीतर येईल नोटीस

अलर्ट! ३० जानेवारीपूर्वी उरकून घ्या 'इन्कम टॅक्स'शी निगडीत 'हे' काम, नाहीतर येईल नोटीस

ITR Verification Last Date : करदात्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आयटीआर फाइल केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:16 PM2023-01-02T17:16:12+5:302023-01-02T17:17:44+5:30

ITR Verification Last Date : करदात्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आयटीआर फाइल केलं आहे.

itr verification last date 30 january 2023 for tax payers after itr filing | अलर्ट! ३० जानेवारीपूर्वी उरकून घ्या 'इन्कम टॅक्स'शी निगडीत 'हे' काम, नाहीतर येईल नोटीस

अलर्ट! ३० जानेवारीपूर्वी उरकून घ्या 'इन्कम टॅक्स'शी निगडीत 'हे' काम, नाहीतर येईल नोटीस

ITR Verification Last Date : करदात्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आयटीआर फाइल केलं आहे. त्यांना आयकर विभागानं आयटीआर व्हेरिफिकेशनसाठी ३० जानेवारी २०२३ पर्यंतचा वेळ दिला आहे. ही मूदत ज्यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत बिलेटेड किंवा रिव्हाइज आयआटीआर फाइल केलं आहे त्यांच्यासाठीच आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं करदात्यांना ३० जानेवारीपूर्वी व्हेरिफिकेशन पूर्ण करण्याची सूचना केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार ज्या नागरिकांची वार्षिक कमाई २.५ लाख ते ५ लाखांच्या घरात आहे अशांनी आयटीआर फाइल करणं गरजेचं आहे. 

ज्यांची वार्षिक कमाई ५ लाखांपेक्षा अधिक आहे अशांना आयटीआर फाइल करणं बंधनकारक आहे. २०२२-२३ मध्ये करदात्यांसाठी बिलेटेड आणि रिव्हाइज आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ ही होती. 

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या माहितीनुसार ज्या करदात्यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत लेट फाइन (दंड) भरुन आयटीआर फाइल केलं आहे. त्यांनी आयटीआरमध्ये नमूद केलेली माहिती व्हेरिफाय करुन घेणं गरजेचं आहे. करदाते आयटीआर ई-व्हेरिफाय करु शकतात. बोर्डानं यासाठी ३० जानेवारी २०२३ पर्यंतची मूदत दिली आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही आयटीआर व्हेरिफाय केलं नसेल तर ते या महिन्याच्या अखेरपर्यंत करुन टाका. नाहीतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस बजावली जाऊ शकते. 

ITR व्हेरिफाय नाही झालं तर काय?

  • सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आपल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे की, दिलेल्या मुदतीत ITR ई-व्हेरिफिकेशन झाले नाही तर ते अवैध मानले जाईल.
  • म्हणजे तुमचा ITR भरणे व्यर्थ ठरेल.
  • ITR मध्ये दिलेल्या सर्व माहितीची पुष्टी करून करदात्यांनी ३० जानेवारी २०२३ पूर्वी ई-व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.
  • असे न केल्यास आयकर विभाग नोटीस, कायदेशीर कारवाई किंवा दंड ठोठावू शकते.


ITR ऑनलाइन करा व्हेरिफाय
विलंबित किंवा सुधारित आयटीआर व्हेरिफाय करण्यासाठी करदाते ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करू शकतात. यासाठी करदात्याला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जावे लागेल आणि ई-व्हेरिफिकेशन पर्याय निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Web Title: itr verification last date 30 january 2023 for tax payers after itr filing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.