Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा

मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून शेअर बाजारात तेजी आली असून, ही तेजी सोमवारीही कायम असल्याचं पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 02:44 PM2019-09-23T14:44:17+5:302019-09-23T14:54:53+5:30

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून शेअर बाजारात तेजी आली असून, ही तेजी सोमवारीही कायम असल्याचं पाहायला मिळालं.

 Diwali gift of Modi government; 11 lakh crore profit to investors | मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा

मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा

नवी दिल्ली: कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून शेअर बाजारात तेजी आली असून, ही तेजी सोमवारीही कायम असल्याचं पाहायला मिळालं. तसेच बाजारातील वाढलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचा एकूण 11 लाख कोटींचा फायदा झाला असल्याचे समोर आले आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय उद्योगजगतासाठी विविध करसुधारणांची घोषणा केली. बाजाराने या सुधारणांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 121.45 अंशांनी वाढीव पातळीवर (36214.92) खुला झाला होता. त्यानंतर तो 38378.02 अंशांपर्यंत वाढला होता. बाजाराच्या अखेरच्या सत्रामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे तो काहीसा खाली येऊन 38,014.62 अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो 1921.15 अंश म्हणजेच 5.32 टक्के वाढला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 10746.80 अंशांवर खुला झाला होता. नंतर तो 11381.90 अंशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. पुढे काहीसा खाली येऊन 11261.05 अंशांवर बंद झाला होता. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये  556.25 अंश म्हणजे 5.20 टक्के वाढ झाली. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये बाजारात तेजीचा संचार असल्याने बाजारात दिवाळीचा उत्साह दिसून आला.

Web Title:  Diwali gift of Modi government; 11 lakh crore profit to investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.