lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > खुशखबर! २ नामांकित बँकांनी बदलले FD चे दर; ८ टक्क्यांपर्यत व्याज मिळणार, जाणून घ्या

खुशखबर! २ नामांकित बँकांनी बदलले FD चे दर; ८ टक्क्यांपर्यत व्याज मिळणार, जाणून घ्या

दोन नामांकित बँकांनी बजेटच्या आधी मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठा बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:25 PM2024-01-25T12:25:32+5:302024-01-25T12:26:45+5:30

दोन नामांकित बँकांनी बजेटच्या आधी मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठा बदल केला आहे.

Union Bank of India and Karnataka Bank have changed the rates of FDs and interest will be up to 8 percent  | खुशखबर! २ नामांकित बँकांनी बदलले FD चे दर; ८ टक्क्यांपर्यत व्याज मिळणार, जाणून घ्या

खुशखबर! २ नामांकित बँकांनी बदलले FD चे दर; ८ टक्क्यांपर्यत व्याज मिळणार, जाणून घ्या

दोन नामांकित बँकांनी बजेटच्या आधी मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठा बदल केला आहे. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचाही (Union Bank of India) समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने अलीकडेच २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल केला आहे. तसेच खासगी क्षेत्रातील कर्नाटक (Karnataka Bank) बँकेने २० जानेवारी २०२४ पासून त्यांचे FD चे व्याजदर सुधारित केले आहेत.

युनियन बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन एफडी दर १९ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही कालावधीच्या एफडीवर ०.५ टक्के अतिरिक्त व्याज दर मिळत आहे. अति ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना FD च्या कोणत्याही कालावधीवर ०.७५ टक्के अतिरिक्त व्याज दर दिला जात आहे. 

युनियन बँक ऑफ इंडियाचे FD दर (सर्वसामान्यांसाठी) 

  • ७ दिवस ते १४ दिवस - ३.५० टक्के
  • १५ दिवस ते ३० दिवस - ३.५० टक्के
  • ३१ दिवस ते ४५ दिवस - ३.५० टक्के
  • ४६ दिवस ते ९० दिवस - ४.५० टक्के
  • ९१ दिवस ते १२० दिवस - ४.८० टक्के
  • १२१ दिवस ते एका वर्षापेक्षा कमी - ४.९० टक्के
  • १ वर्ष - ६.७५ टक्के
  • १ वर्ष ते ३९८ दिवसांपेक्षा कमी - ६.७५ टक्के
  • ३९९ दिवस - ७.२५ टक्के
  • ४०० दिवस ते २ वर्ष - ६.५० टक्के
  • २ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी - ६.५० टक्के
  • ३ वर्ष - ६.५० टक्के
  • ३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५ वर्षांपर्यंत - ६.५० टक्के
  • ५ वर्ष ते १० वर्षांपर्यंत - ६.५० टक्के

कर्नाटक बँकेचे एफडी दर (१ कोटीपेक्षा कमी)

  • ७ दिवस ते ४५ दिवस - ३.५० टक्के
  • ४६ दिवस ते ९० दिवस - ४.०० टक्के
  • ९१ दिवस ते १७९ दिवस – ५.२५ टक्के
  • १८० दिवस - ६.०० टक्के
  • १८१ दिवस ते २६९ दिवस - ६.०५ टक्के
  • २७० दिवस ते एका वर्षापेक्षा कमी - ६.५० टक्के
  • १ वर्ष ते २ वर्ष - ६.९५ टक्के
  • ३७५ दिवस - ७.१० टक्के
  • ४४४ दिवस - ७.२५ टक्के
  • २ वर्ष आणि ५ वर्षांपर्यंत - ६.५० टक्के
  • ५ वर्ष ते १० वर्षांपर्यंत- ५.८० टक्के 

Web Title: Union Bank of India and Karnataka Bank have changed the rates of FDs and interest will be up to 8 percent 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.