lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...

मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील नववे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:45 PM2023-04-05T21:45:40+5:302023-04-05T21:45:56+5:30

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील नववे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Mukesh Ambani's biggest syndicated loan in corporate history? Agreement with 'these' banks... | मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...

मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...


Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने सिंडिकेट कर्जाच्या माध्यमातून मोठी रक्कम उभारली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिची दूरसंचार शाखा Jio Infocomm ने बॅक-टू-बॅक परकीय चलन कर्जाच्या रूपात एकूण $ 5 अब्ज उभे केले आहेत. भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील गेल्या 5 वर्षातील हे सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार, रिलायन्सने गेल्या आठवड्यात 55 बँकांकडून $3 अब्ज जमा केले आणि आता रिलायन्स जिओ इन्फोकॉमने पुन्हा $2 बिलियनचे अतिरिक्त कर्ज मिळवले आहे. 31 मार्चपूर्वी 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यात आले होते. या आठवड्यात मंगळवारी दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज उभारण्यात आले.दरम्यान, रिलायन्स समूहाने 55 बँकांकडून तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. सुमारे दोन डझन तैवानच्या बँका 2 अब्ज कर्जासाठी पुढे आल्या आहेत. 

याव्यतिरिक्त, बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole सारख्या जागतिक दिग्गजांसह सुमारे 55 बँकांनी US$ 3 अब्ज  कर्ज दिले. रिलायन्स इंडस्ट्रीज प्रामुख्याने सिंडिकेट कर्जातून उभारलेल्या पैशाचा वापर त्यांच्या कॅपेक्स खर्चाची पूर्तता करण्यासाठी करेल, तर Jio हे पैसे त्यांच्या देशव्यापी 5G नेटवर्क रोलआउटसाठी वापरेल.

Web Title: Mukesh Ambani's biggest syndicated loan in corporate history? Agreement with 'these' banks...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.