lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > काम लवकर उरकून घ्या, एप्रिल महिन्यात बॅंका राहणार ११ दिवस बंद

काम लवकर उरकून घ्या, एप्रिल महिन्यात बॅंका राहणार ११ दिवस बंद

एप्रिल महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 08:44 AM2023-03-11T08:44:12+5:302023-03-11T08:53:33+5:30

एप्रिल महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. 

Get the job done early banks will be closed for 11 days in the month of April bank holidays | काम लवकर उरकून घ्या, एप्रिल महिन्यात बॅंका राहणार ११ दिवस बंद

काम लवकर उरकून घ्या, एप्रिल महिन्यात बॅंका राहणार ११ दिवस बंद

मुंबई :  नवे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू हाेणार आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात २०२३-२४ पासून काही मोठे बदल होणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये बॅंकेत महत्त्वाची कामे असतात. त्यामुळे या महिन्यात बॅंका किती दिवस बंद राहतील, याबाबत माहिती आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. 

या सुट्ट्या विविध राज्यांनुसार कमी-अधिक आहेत. एप्रिल महिन्यातील सुट्यांची सुरुवात ही १ एप्रिलपासून होईल. या दिवशी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँकांना सुटी असेल. त्यानंतर विविध सुट्ट्यांमुळे बॅंका ११ दिवस बंद राहतील.

अशा आहेत सुट्ट्या
२ एप्रिल : रविवार 
४ एप्रिल : भगवान महावीर जयंती
७ एप्रिल : गुड फ्रायडे
८ एप्रिल : दुसरा शनिवार
९ एप्रिल : रविवार
१४ एप्रिल : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१६ एप्रिल : रविवार
२२ एप्रिल : रमजान ईद, दुसरा शनिवार
२३ एप्रिल : रविवार
३० एप्रिल : रविवार 

Web Title: Get the job done early banks will be closed for 11 days in the month of April bank holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक