Amazon चा दणका! ६०० चिनी ब्रॅंड्सवर घातली कायमची बंदी; नेमके कारण काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 03:38 PM2021-09-19T15:38:59+5:302021-09-19T15:40:30+5:30

ॲमेझॉनने तब्बल ६०० चिनी ब्रॅंड्सवर कायमची बंदी घातल्याची माहिती मिळत आहे.

amazon permanently bans 600 chinese brand from its site as action against fake reviews taken | Amazon चा दणका! ६०० चिनी ब्रॅंड्सवर घातली कायमची बंदी; नेमके कारण काय? पाहा

Amazon चा दणका! ६०० चिनी ब्रॅंड्सवर घातली कायमची बंदी; नेमके कारण काय? पाहा

Next

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीचे नाव म्हणजे ॲमेझॉन. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकविध योजना Amazon आणत असते. याशिवाय आता UPI च्या माध्यमातून ऑनलाइन डिजिटल व्यवहारांचीही सुविधाही ॲमेझॉनने सुरू केली आहे. मात्र, ॲमेझॉनने तब्बल ६०० चिनी ब्रॅंड्सवर कायमची बंदी घातल्याची माहिती मिळत आहे. (amazon permanently bans 600 chinese brand from its site as action against fake reviews taken) 

Indian Railways ची खास योजना; ५० हजार तरुणांना देणार प्रशिक्षण; विविध क्षेत्रात नोकरीची संधी

एका अहवालानुसार, ॲमेझॉनने ६०० चिनी ब्रॅंड्सवर कायमची बंदी घातली असून, हे ब्रँड Amazon च्या धोरणांचे उल्लंघन करत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. काही चिनी ब्रँड ग्राहकांना सकारात्मक रिव्ह्यूच्या बदल्यात गिफ्ट कार्ड देत देत असल्याचेही एका अहवालात म्हटले आहे. 

Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा

धोरणांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

ॲमेझॉनने म्हटले आहे की, ग्राहक खरेदीचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी उत्पादन पुनरावलोकनांच्या अचूकतेवर आणि सत्यतेवर अवलंबून असतात आणि आमच्या समीक्षकांसाठी आणि विक्री भागीदारांसाठी स्पष्ट धोरणे आहेत. ती आमच्या समुदाय वैशिष्ट्यांचा गैरवापर प्रतिबंधित करतात. आम्ही या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निलंबन, बंदी आणि कायदेशीर कारवाई करतो. ही चीनला लक्ष्य करण्याची मोहीम नसून ती एक जागतिक मोहीम आहे, असे ॲमेझॉनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ

ग्राहकांच्या हितासाठी कठोर पावले

आम्ही गैरवर्तन शोधण्यात सुधारणा करणे आणि वाईट कृत्यांविरूद्ध अंमलबजावणी आणि कारवाई करणे सुरूच ठेवणार आहोत. आम्हाला खात्री आहे की, आम्ही जी पावले उचलली आहेत ती आमच्या ग्राहकांच्या हितासाठी आहेत, असे ॲमेझॉनकडून सांगण्यात आले आहेत. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Vi सह सर्व दूरसंचार कंपन्यांना दिलासा; ९ उपायांची घोषणा

दरम्यान, सर्व ब्रँडची नावे माहित नसली तरी, त्यापैकी काही चीनमध्ये मोठे लोकप्रिय ब्रँड आहेत.  Aukey Mpow, RavPower आणि Vava अशा बँड्सचा यामध्ये समावेश आहे. मात्र, अनेक स्तरातून ॲमेझॉनच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, ॲमेझॉनने घेतलेला निर्णय योग्य आणि कौतुकास्पद आहे. यामुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास आणखी वृद्धिंगत आणि दृढ होईल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: amazon permanently bans 600 chinese brand from its site as action against fake reviews taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app