गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण कधी काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:48 IST2024-12-11T15:47:24+5:302024-12-11T15:48:18+5:30

डिसेंबर २०२५ मध्ये अधिसूचना निघणार : थेट निवडणुकीतून सरपंच पदाची निवड होणार

When will the reservation of the Sarpanch post of the group Gram Panchayat be removed? | गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण कधी काढणार?

When will the reservation of the Sarpanch post of the group Gram Panchayat be removed?

लोकमत न्यूज नेटवर्क 
चुल्हाड (सिहोरा):
सलग दहा वर्षांपासून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीतून दूर असलेल्या तुमसर तालुक्यातील १८ गट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना डिसेंबर २०२५ मध्ये निघणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सरपंच व सदस्य पदाची निवडणूक होणार आहे. या गट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी सुरू झाली आहे. सरपंच पदाचे आरक्षण माहीत होणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.


तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती आहेत. यात १८ गट ग्रामपंचायत असून सार्वत्रिक निवडणुका २०२१ वर्षात जानेवारी महिन्याचे पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना डिसेंबर महिन्यात काढण्यात येत आहे. यामुळे गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीला फक्त १ वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. गट ग्रामपंचायतीला सलग दहा वर्षापासून थेट सरपंच पदाची निवडणूक प्राप्त झाली नाही. सरपंच पद सदस्यामधून निवड करण्यात आले आहे. 


सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक आटोपल्यानंतर काढले जात आहे. गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण काढताना तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्यात येत आहे. यामुळे ८९ ग्रामपंचायत गावात अडीच वर्षापूर्वीच सरपंच पदाचे आरक्षण माहीत होत आहे. परंतु अशी स्थिती गट ग्रामपंचायतच्या गावात माहिती होत नाही. यामुळे निवडणुकीच्या काळात गावातील नागरिकांमध्ये साशंकता निर्माण होत आहे. 


८९ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण सन २०२१ मध्ये घोषित करण्यात आले होते. परंतु ही संधी गट ग्रामपंचायतच्या गावांना कधी मिळाली नाही. १ वर्ष ग्रामपंचायत निवडणुकीला शिल्लक असल्याने सरपंच पदाचे आरक्षण गट ग्रामपंचायतच्या गावात घोषित करण्याची ओरड गावातील नागरिकांनी सुरू केली आहे. 


थेट निवडणुकीने गावात उत्सुकता
गट ग्रामपंचायतला थेट सरपंच पद निवडणूक मिळाली नाही. अन्य गावांना मिळाली आहे. सरकार बदलले म्हणजे सरपंच पद निवडणुकीचे निर्णय बदलत गेले आहेत. यामुळे थेट सरपंच पद निवडणुकीत गट ग्रामपंचायत दूर गेल्या आहेत. आता या गावांना थेट सरपंच पदाचे निवडणुकीची संधी मिळणार असल्याने गावात उत्सुकता वाढली आहे. आता सरपंच पदाच्या आरक्षणाकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: When will the reservation of the Sarpanch post of the group Gram Panchayat be removed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.