फिट्स आजार काय आहे? आल्यास काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:04 IST2025-04-26T16:04:17+5:302025-04-26T16:04:47+5:30

Bhandara : फिटचा शरीरावर काय परिणाम होतो

What is fits? What to do if you get it? | फिट्स आजार काय आहे? आल्यास काय कराल?

What is fits? What to do if you get it?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
फिट्स आकडी किंवा दातखिळी म्हणजे मेंदूतील विद्युतक्रिया असामान्य होणे. ज्यामुळे अचानक झटके येऊ लागतात. अशावेळी घरगुती उपाय न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


फिटचा शरीरावर काय परिणाम होतो
फिटसमुळे स्नायू कडक होऊन हालचाली अनियंत्रित होतात. काहीवेळा तो व्यक्ती बेशुद्धदेखील होऊ शकतो. दीर्घकाळ फिटसचा त्रास होत राहिल्यास मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.


फिट्स कोणत्या प्रकारचा आजार ?
फिट्स हा मेंदूच्या विद्युत क्रियाकलापामध्ये होणाऱ्या बदलामुळे येणारा त्रास आहे. त्याला एपिलेप्सी किंवा अपस्मार असेही म्हणतात. अशा स्थितीत मेंदूतील पेशी असामान्यरीत्या सक्रिय होतात.


फिट आल्यास काय करावे...?

  • फिट येणे म्हणजे डोक्यात काहीतरी गडबड होणे, शरीराला झटके येणे. फिट येत असेल तर त्या व्यक्तीस सुरक्षित ठिकाणी हलवावे.
  • आजूबाजूला असलेली धोकादायक वस्तू दूर करावी. डोक्याखाली मऊ वस्तू ठेवून लगेच डॉक्टरांना कळवावे.


फिट्स म्हणजे काय...?
फिट्स म्हणजे अचानक आणि अनियंत्रित शरीराची हालचाल किंवा संवेदना होणे. याला 'अपस्मार' किंवा 'मिरगी' असेही म्हणतात. फिटस आल्यास त्या व्यक्तीला झटके येऊ लागतात. काहीवेळा शरीराच्या चेतना कमी होऊ शकतात.


"फिटचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे फोकल ऑनसेट फिट्स आणि जनरलाइज्ड ऑनसेट फिट्स हे आहेत. फिट आल्यानंतर घरच्यांनी खासगी औषधी न देता तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे."
- डॉ. दीपचंद सोयाम, सीएस, भंडारा.

Web Title: What is fits? What to do if you get it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.