भंडारा जिल्ह्यात रेतीच्या तीन कारवाया, ५२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:39 IST2025-06-19T15:39:16+5:302025-06-19T15:39:53+5:30

Bhandara : ५३ हजारांच्या रेतीसह तीन ट्रॅक्टर आणि एक टिप्पर जप्त

Three sand mining operations in Bhandara district, valuables worth 52.54 lakhs seized | भंडारा जिल्ह्यात रेतीच्या तीन कारवाया, ५२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Three sand mining operations in Bhandara district, valuables worth 52.54 lakhs seized

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
गेल्या २४ तासात जिल्हा पोलिसांनी तीन ठिकाणी रेती तस्करांविरुद्ध कारवाई केली. यात ५३ हजारांच्या रेतीसह वाहने मिळून ५२ लाख ५४ हजार रुपयांचा माल जप्त केला. या जप्तीमध्ये तीन ट्रॅक्टर आणि एका टिप्परचा समावेश आहे.


कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत झालेल्या कारवाईत १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. १७ जूनला रात्री २:२० वाजताच्या सुमारास खमारी नाला येथे पोलिस हवालादार दिलीप धावडे पेट्रोलींग करीत असता ट्रॅक्टर एमएच ३६/एजी ०८६७ आणि बिना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली जप्त केली. (चालक-मालक खिलोन राजु शेन्डे, खमारी), तसेच, ट्रॅक्टर एमएच ३६ / झेड ८७९५ आणि संलग्नित ट्रॉली (चालक मालक निलेश शंकर पवनकर, खमारी) यांच्या ताब्यातील दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रत्येकी एक ब्रॉस रेती (किंमत १२ हजार रुपये) तसेच, दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत १२ लाख) असा १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


दुसरी कारवाई तुमसर पोलिसांच्या हद्दीत झाली. या कारवाईत ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. ६:१५ वाजताच्या सुमारास, गोबरवाहीचे पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गिते पेट्रोलींग करीत असताना बाजार चौक आलेसुर येथे चालक मालक कैलास किसन गराट (लेंडेझरी) याच्या ताब्यातील ट्रॅक्टरएमएच ३६ / एएल ८७४२ आणि जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली रेतीची चोरटी वाहतुक करताना जप्त केली. ट्रॅक्टर व ट्रालीची किंमत ५ लाख रुपये आणि एक ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदविला. तिसरी कारवाई वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत झाली. एकलारी येथे पेट्रोलींग करताना टिप्पर एमएच ४० / सीटी ९२३८ जप्त केला. चालक संजयकुमार अतकरी, भांडेवाडी नागपूर, आकाश धुर्वे (भामेवाडा ता. कुही) मालक स्वप्नील भोंदले (पाचगाव, नागपूर) यांच्यावइरुद्ध गुन्हा नोंदविला. यात ६ ब्रॉस रेती अणि ३५ लाखांचा टिप्पर असा ३५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिन्ही गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात कारवाया करण्यात आल्या. 


आलेसुर येथे अवैध रेती तस्करीवर छापा
गोबरवाही : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. १७जूनला सायंकाळी सहा वाजता आलेसूर येथील बाजार चौकात पेट्रोलिंग दरम्यान ट्रॅक्टरद्वारे रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत ट्रॅक्टर (एमएच ३६ /एएल ८७४२) आणि टॉलीसह सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कैलास गराट, (लेंडेझरी) यांच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणतेही वैध परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७ व ९ तसेच मोटर वाहन अधिनियम ५०/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three sand mining operations in Bhandara district, valuables worth 52.54 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.