राज्यस्तरावर बाजी मारणाऱ्या गणेशोत्सव मंडळाला मिळणार ५ लाखांपर्यंतचे बक्षीस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:32 IST2024-08-06T12:28:51+5:302024-08-06T12:32:04+5:30
Bhandara : पहिले बक्षीस ५ लाखांचे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

The Ganeshotsav Mandal, which competes at the state level, will get a prize of up to 5 lakhs!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर यासाठी समितीचे गठन करण्यात आले असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर आहेत.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या विजेत्यांबरोबरच राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
धर्मादाय आयुक्त आणि स्थानिक पोलिसांकडे नोंदणी आवश्यक या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकड नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंव स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणान असल्याची माहिती देण्यात आली.
होणार अभिप्रायासह गुणांकन
जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून
व्हिडीओग्राफी व कागदपत्र जमा करून घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल.