शिक्षण विभागातील दिरंगाईवर शिक्षकांचा संताप; जिल्हाभरातून ५०० शिक्षकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:40 IST2025-08-05T17:39:08+5:302025-08-05T17:40:15+5:30

तबब्ल चार तास सभा : शिक्षक आमदारांनी घेतला शिक्षण विभागाचा वन बाय वन क्लास

Teachers angry over delays in education department; 500 teachers from across the district present | शिक्षण विभागातील दिरंगाईवर शिक्षकांचा संताप; जिल्हाभरातून ५०० शिक्षकांची उपस्थिती

Teachers angry over delays in education department; 500 teachers from across the district present

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांना घेऊन सोमवारला शिक्षकांच्या १३ संघटनांनी एकत्र येत वज्रमुठ बांधली. सांधिक एकोप्याचे दर्शन घडवित जिल्हा परिषदेसमोर बैठा सत्याग्रह आंदोलन केले. यानंतर आजी-माजी शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत तब्बल चार तास सभा घेत जणू शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा वन बाय वन क्लासच घेतला. यात काही प्रकरणे मार्गीही लागली.


लोकप्रतिनिधीच्या सभेत ठरलेल्या मुद्द्यांची दिशाभूल करणे, वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे अवमानप्रकरणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व्हि.यू. डायगव्हाणे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. यावेळी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराविरुद्ध रोषही व्यक्त करण्यात आला. समस्या सुटणार नसतील तर कितीदा आंदोलने करावीत असा प्रश्न उपस्थित केला गेला. 


बीएलओची कामे नको
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एकाच शाळेतील शिक्षकांचे बीएलओ म्हणून नियुक्ती करू नये. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेला देणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेंशन वेळेवर देणे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रकरणे आठ दिवसात निकाली काढण्यावरही चर्चा झाली.


जिल्हाभरातून आंदोलनाला शेकडो शिक्षकांची उपस्थिती
यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, व्ही यु डायगव्हाणे, टेकचंद मारबाते, अतुल लोंढे, अविनाश बडे, अनिल गोतमारे, राजेश धुर्वे, सुधाकर देशमुख, भूषण तल्हार, विठ्ठल जुनघरे, विजय गोमकर चंद्रशेखर राहांगडाले, धिरज बांते, धनंजय बिरणवार, मार्तंड गायधने, दारासिंग चव्हाण, प्रभाकर मेश्राम, रुपेश नागलवाडे, प्रवीण गजभिये यांच्यासह विविध शिक्षक संघटनांमधील जिल्हाभरातून आलेले जवजळपास पाचशे शिक्षकांची उपस्थिती होती. 


शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई
जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांचे प्रश्न तसेच सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांच्या फाईली शिक्षण विभागात धुळखात आहेत. शिक्षकांच्या समस्या मार्गी लावाण्यासाठी संघटनेकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. यात शिक्षक आमदारांनी स्वतः तीन महिण्यापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकारी सीईओ, समाज कल्याण अधिकारी तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानुसार समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिलें. मात्र एकही समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे विमाशिने ४ ऑगस्ट रोजी बैठा सत्याग्रह आंदोलन केले. उत्तरे देतांना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.


 

Web Title: Teachers angry over delays in education department; 500 teachers from across the district present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.