विद्यार्थिनीचे शाळेसमोरून केले अपहरण; जंगलात नेऊन अतिप्रसंगाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:40 IST2025-03-17T11:39:48+5:302025-03-17T11:40:42+5:30

Bhandara : मामाच्या घरी सोडून देण्याची केली बतावणी

Student kidnapped from in front of school; Attempted rape by taking her to the forest | विद्यार्थिनीचे शाळेसमोरून केले अपहरण; जंगलात नेऊन अतिप्रसंगाचा प्रयत्न

Student kidnapped from in front of school; Attempted rape by taking her to the forest

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर :
चार दिवसांपूर्वीच एका महाविद्यालयीन तरुणीने धाडस दाखवत स्वतःची नराधमाच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला होता. या घटनेची शाई वाळत नाही, तोच शनिवारी (१५ मार्च) पुन्हा एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे शाळेसमोरून अपहरण करण्यात आले. तिला जंगलात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान दाखवत अंगणवाडी सेविकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीची सुटका केली. याप्रकरणी तुसमर पोलिसांनी शुभम उईके (२१) रा. सौदेपूर, ता. तुमसर याला अटक केली आहे. शुभम उईके हा अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शाळेबाहेर शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी घेऊन उभा होता. विद्यार्थिनी घरी जात असताना, 'तुला मामाच्या घरी सोडून देतो', असे म्हणत शुभम विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवून जंगलात घेऊन गेला. अल्पवयीन मुलीच्या आईने तुमसर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी विरुद्ध कलम १३७ (२) ९६ भारतीय न्याय संहिता पोक्सो १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक पूनम साठे करीत आहेत. 


अंगणवाडी सेविकेचे प्रसंगावधान
विद्यार्थिनी ही शाळेतून शुभमच्या दुचाकीवरून जाताना अंगणवाडी सेविकेने पाहिले होते. अंगणवाडी सेविकेने तत्काळ विद्यार्थीनीच्या मामाच्या घरी जाऊन याबाबत माहिती दिली. मामाने क्षणाचाही विलंब न लावता गावातील इतर लोकांना सोबत घेतले व जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात शोध घेतला असता, शुभम आढळला. त्याला पकडण्यात आले.

Web Title: Student kidnapped from in front of school; Attempted rape by taking her to the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.