भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडविले; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 9, 2025 18:48 IST2025-05-09T18:47:22+5:302025-05-09T18:48:54+5:30

Bhandara : साकोलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घटना

Speeding truck hits two bikers; one dead, another seriously injured | भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडविले; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

Speeding truck hits two bikers; one dead, another seriously injured

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
साकोली येथील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून आपल्या गावी दुचाकीने परत जात असणाऱ्या दुचाकीस्वारांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात एकाला अक्षरश: चिरडले गेले तर, दुसरा जखमी झाला. ही घटना साकोली राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडली. अपघातानंतर ट्रक पसार झाला.

मृताचे नाव सुभाष धनीराम भाजीपाले (४२) असे असून धनराज कापगते (५५) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही परसोडी या गावातील रहिवासी आहेत. हे दोघेही शुक्रवारी दुपारी आपल्या गावावरून साकोली येथे काही कामानिमित्त मोटरसायकलने (एमएच ३६ / सी ४९०२) आले होते. काम आटोपल्यावर गावी परतण्याआधी त्यांनी मोदी पेट्रोल पंप येथून पेट्रोल भरले. त्यानंतर ते गावी जाण्यासाठी निघाले असता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील श्रीराम भात गिरणी समोर अज्ञात ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात सुभाष भाजीपाले जागीच ठार झाले.

हे घटनास्थळ शहराच्या परिसरातच आहे. अपघातानंतर जोरदार आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुभाष भाजीपाले यांना चिरडल्याने त्यांचा काही वेळातच मृत्यू झाला. जखमी अवस्थेतील धनराज कापगते यांना नागरिकांनी आणि पोलिसांनी स्थानिक खाजगी रुग्णालयात पोहचविले. मृताचे शव उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: Speeding truck hits two bikers; one dead, another seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.