भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 5, 2025 14:12 IST2025-06-05T14:11:23+5:302025-06-05T14:12:35+5:30

Bhandara : साकोली जवळील विर्शी फाट्याजवळील घटना

Speeding bus hits tractor; tractor driver dies | भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

Speeding bus hits tractor; tractor driver dies

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
साकोली तालुक्यातील विर्शीफाट्याजवळ महामार्गावर प्रवासी घेऊन साकोलीच्या दिशेने येणारी भरधाव निघालेली बस ट्रॅक्टरवर आदळली. त्यात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात सकाळी १०:३० वाजतादरम्यान घडला. लेखचंद गोपीचंद कापगते (५०, विर्शी), असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.

साकोली तालुक्यातील विर्शी येथील लेखचंद कापगतेहा ट्रॅक्टर घेऊन साकोलीकडे जात असतांना विर्शी फाट्यावरून एमएच ४० एल ८८७२ क्रमांकाची बस प्रवासी घेऊन साकोलीकडे निघाली होती. दरम्यान, बसचालक विकास लाडे (मुरारटोली, गोंदिया) याने बसपुढे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागेहून धडक दिली. यात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, सदर बस नागपूर डेपोची असून गोंदिया येथून नागपूरला जात होती. अपघाताची माहिती साकोली पोलिसांना मिळताच हवालदार पूनम जांभूळकर यांनी आपल्यासहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून ट्रॅक्टरचालकाला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद साकोली पोलिसात झाली असून तपास घेतला जात आहे.

Web Title: Speeding bus hits tractor; tractor driver dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.