४४ अंश तापमानात रोहयोच्या मजुरांना करावे लागते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:58 IST2025-05-09T12:57:46+5:302025-05-09T12:58:42+5:30
१११३ कामे सुरू : जिल्ह्यातील मजुरांच्या हातांना मिळाले काम

Rohyo laborers have to work in 44 degree temperatures
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :भंडाराचा पारा ४४ अंशांपार पोहोचला आहे. अशा तापमानात अंगाची लाहीलाही होत आहे. अशाही वातावरणात पोटाची खळगी भरण्यासाठी रोहयो मजूर काम करताना दिसून येत आहेत. सद्यःस्थितीत भंडारा जिल्ह्यात १११३ 'रोहयो'ची कामे सुरू असून, त्या कामांवर ५४ हजार ९३२ मजूर आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध कामे केली जातात. या कामांवर हजारो मजूर जात असून, त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे. रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या पुढाकाराने रोहयो कामावर सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच कामाच्या वेळेतही बदल केला आहे. तरीही तप्त उन्हाच्या झळा मजुरांना बसत असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी ते राबत आहेत.
३१२ रोहयो मजुरांना मजुरी दिली जात आहे.
महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना या तुटपुंज्या मजुरीत पोट कसे भरणार, असा प्रश्न रोहयो मजुरांपुढे आहे. त्यामुळे मजुरीत वाढ होणे अपेक्षीत आहे.
सकाळी ११ पर्यंत व दुपारी ४ नंतर कामावर मनरेगाअंतर्गत यंत्रणानिहाय सुरू कामे व मजूर
- तप्त उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून सकाळी सात ते ११ व दुपारी ४ वाजल्यापासून 'रोहयो'च्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. कामाच्च्या ठिकाणी पाणी व इतर साहित्याची सोय करण्यात आली आहे.
- तप्त उन्हात मजुरांना काम करावे लागू नये म्हणून कामाच्या वेळेत बदल केला आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय, यासोबतच आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
तालुक्यात किती मजूर ?
तालुका मजूर
भंडारा ४१७९
लाखांदूर ८५०
लाखनी १४२५९
मोहाडी १२८७२
पवनी १५१७
साकोली १६४२७
तुमसर ४८२८
एकुण ५४९३२
रोहयोच्या कामावर ५४ हजार ९३२ मजूर
उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला काम नसते. 'रोहयो'मुळे त्या मजुरांना दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत, वनविभाग, बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभागाअंतर्गत रोजगार हमीची अशी मजूर एकूण १ हजार ११३ कामे सुरू आहेत. या कामांवर ५४ हजार ९३२ मजूर कामावर आहेत.
साकोली तालुक्यात सर्वाधिक मजूर
रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात तब्बल १ हजार ११३ कामे सुरू असून ५४ हजार ९३२ मजूर कामावर आहेत. यांपैकी सर्वाधिक मजूर साकोली तालुक्यात १६ हजार ४२७ मजूर कामावर आहेत.