पालांदुरातील रस्त्यांसाठी हवा ३.९० कोटी रुपयांचा बुस्टरडोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:48 IST2025-08-04T15:47:02+5:302025-08-04T15:48:32+5:30
निधीची प्रतीक्षा : बायपास, मुख्य रस्त्याच्या गटारांची दुरवस्था

Roads in Palandur need Rs 3.90 crore in booster doses
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : तालुक्यानंतरचे महत्त्वाचे खेडेगाव म्हणून ओळखले जाणारे पालांदूर हे गाव शासनाकडून विकासासाठी निधी न मिळाल्यामुळे अडचणीत सापडले आहे. येथे मुख्य समस्या रहदारीशी संबंधित असून, बायपाससाठी ३.९० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ही मागणी जिल्हा विकास निधीअंतर्गत करूनही दुर्लक्षित आहे.
पालांदूरचा मुख्य रस्ता तसेच त्याला जोडणाऱ्या गावातील रस्ते खूपच खराब अवस्थेत आहेत. पालांदूरला जोडणाऱ्या इतर ग्रामीण रस्त्यांवर चिखल जमा झालेले असून काळजी घेण्यात अडचणी आहेत. निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यांमध्ये दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना, शासनाकडून निधीच्या तरतकाचे कारण दाखवले जात आहे मुख्य रस्त्याच्या गटारांची अवस्था फारच बिघडलेली असून गावातून जाणारा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा असला तरी निधीअभावी नालींची निर्मिती नाही, त्यामुळे वळणावर अपघात होण्याचा धोका दररोज निर्माण होत आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून मिळालेला निधी अपुरा असल्यामुळे गटारांची उंची वाढवता आली नाही.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्यामुळे नालींची दुरुस्ती शक्य नाही. पालांदूरसाठी बायपास महत्त्वाचा आहे. वाढत्या रहदारीला न्याय देण्यासाठी पालांदूरच्या बाहेरून जात असलेला आणि संजयनगरात थेट जोडणारा बायपास अनेक वर्षे प्रतीक्षेत आहे. पालांदूरमधील दुसरा रस्तासुद्धा अत्यंत खराब अवस्थेत असून खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यालादेखील दुरुस्तीची गरज आहे. संताजी सभागृहापासून सार्वजनिक हनुमान देवस्थानापर्यंत रस्त्याचे बांधकाम होणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पोहोचला आहे; पण निधीअभावी काम झालेले नाही.
पालांदूरच्या जोड रस्त्यांचीही दुरवस्था
भागातील रस्ते फुटले आहेत. पालांदूरला जोडणाऱ्या दैनंदिन व्यवहारांसाठी महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. पालांदूर ते गोंदी-देवरी, पालांदूर ते पहाडी, पालांदूर-पाथरी नाल्यावर पूल प्रतीक्षेत आहे, तसेच पालांदूर-ढिवरखेडा नाल्यावर पूल आणि पालांदूर-निमगाव नाल्यावर पूलदेखील बांधणीसाठी प्रतीक्षेत आहेत. पालांदूरमधील अंतर्गत रस्ते चिखलमय आहेत. जलजीवन सेवेचा निधी प्राप्त झाला असूनही तो अपुरावा आहे.
पाणीपुरवठा योजनाही अर्धवट
अपुऱ्या निधीमुळे पाणीपुरवठा योजनाही अर्धवट राहिल्या आहेत. चांगली स्थिती असलेले रस्ते फुटपाथ केले गेले असून, कंत्राटदारांचे बिल थकले असल्यामुळे कामे थांबून आहेत. निधीचा अभाव असल्याने काम पुढे कसे होईल हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.