बंदूक परवाना असणाऱ्यांची पोलिसांकडून पडताळणी! परवाने रद्द करण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:36 IST2025-02-19T14:35:44+5:302025-02-19T14:36:31+5:30

Bhandara : जिल्ह्यात शस्त्रपरावने किती?

Police verify gun license holders! Licenses cancelled | बंदूक परवाना असणाऱ्यांची पोलिसांकडून पडताळणी! परवाने रद्द करण्यात आले

Police verify gun license holders! Licenses cancelled

भंडारा : निवडणुकीदरम्यान शस्त्रे जमा करण्यात आली होती. ती नंतर पुन्हा परत देण्यात आलीत. पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. यामध्ये परवानाधारक शस्त्र असणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. ही प्रक्रिया सुरूच असल्याचे सांगण्यात येते.


जिल्ह्यात शस्त्रपरावने किती?
शस्त्रासाठी अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून त्याची शहानिशा केली जाते. मात्र, त्याला अंतरिम मंजुरी ही जिल्हाधिकाऱ्यांची असते. भंडाऱ्यात साधारणतः २३० पेक्षा अधिक जणांकडे शस्त्र परवाने आहेत.


किती परवाने रद्द करण्यात आले?
अन्य जिल्ह्यांत शस्त्र आढळल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली. अनावश्यक परवाने रद्द करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचीही तपासणी केली जात असल्याचेही समजते.


शस्त्र परवाने रद्द करण्यामागील प्रमुख कारणे

  • शस्त्राचा गैरवापर : शस्त्राचा गैरवापर केल्यास किंवा शस्त्राच्या बळावर धमकावल्याचे सिद्ध झाल्यास परवाना रद्द होऊ शकतो.
  • सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन : सार्वजनिक ठिकाणी स्वतःजवळ असलेल्या शस्त्राचे प्रदर्शन केल्यास परवाना रद्द होऊ शकतो.
  • सोशल मीडियावर प्रदर्शन : सोशल मीडियावर रील किंवा पोस्ट केल्यास परवाना रद्द केला जातो.
  • धाक दाखवणे : शस्त्राचा धाक दाखविल्यास परवाना रद्द व गुन्हा दाखल केला जातो.


मुदतीत नूतनीकरण आवश्यक
मुदत संपण्यापूर्वी ६० दिवस अगोदर शस्त्र परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. वेळेत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच निवडणूक काळात शस्त्र जमा न केल्यास कारवाई होऊ शकते.


 

Web Title: Police verify gun license holders! Licenses cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.