पवनी पोलिसांकडून नॉयलॉन मांज्याविरोधात कारवाईला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:52 IST2024-12-25T13:51:37+5:302024-12-25T13:52:28+5:30
विक्रेत्यांवर कारवाई होणार : दुकानांची करणार तपासणी

Pawani police initiate action against nylon threads selling
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरला (पवनी) : तोंडावर मकर संक्रांतीचा सण येत आहे. या पर्वामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी होते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत यात सहभागी होऊन शर्यती लावतात. यात मोठ्या प्रमाणावर नॉयलॉन मांजाचा वापर होतो. यामुळे अनेकांचे जीव गेले असून अनेकांना दुखापतही झाली आहे. त्यावर बंदी असूनही विक्री आणि खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पवनी पोलिसांनी या विरोधात कारवाई सुरू केली आहे.
पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निखिल रहाटे, तिजारे, नायक किशोर बुरडे, शिपाई अनिल घरट, हवालदार राजू पारधी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. पवनी शहर, आसगाव, भुयार, कन्हाळगाव, खापरी येथील पतंग विकणाऱ्या दुकानामध्ये पतंग व नायलॉन मांज्याची तपासणी केली जाणार आहे. नायलान मांज्याची विक्री करू नये याबाबत पोलिस विभागाने नागरिकांना आणि दुकानदारांना माहिती दिली आहे. तरीही नियमभंग करून विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.