बेपत्ता योगेशचे कुजलेले प्रेत ४० दिवसांनंतर सापडले, घातपात की आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 19:04 IST2023-04-07T19:04:09+5:302023-04-07T19:04:47+5:30
आधार कार्डवरून पटली ओळख.

बेपत्ता योगेशचे कुजलेले प्रेत ४० दिवसांनंतर सापडले, घातपात की आत्महत्या?
गोपालकृष्ण मांडवकर/पवनी (भंडारा) : मागील ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या योगेश सीताराम लोखंडे या ४० वर्षीय व्यक्तीचे प्रेत शुक्रवारी इटगाव येथील शेतालगतच्या पाटामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांच्या तपासात मृताच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. त्याच्या मृत्यूचे कारण घातपात हे रहस्य मात्र कायमच आहे.
पवनी येथील पद्मा वॉर्डात राहाणारा योगेश लोखंडे २७ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. इटगाव येथील पोलिस पाटलांना पाटामध्ये कुण्या व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी पवनी पोलिसांत कळविले. पंचनामा करताना मृताच्या खिशामध्ये असलेल्या पॉकेटात आधार कार्ड मिळाले. त्यावरील पत्ता आणि छायाचित्रावरून माहिती काढली असता मृत व्यक्ती योगेश लोखंडे असल्याचे तपासात पुढे आले.