डोंगरी चिखला खाणीतून मँगनिज चोरी; आशीर्वाद कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:49 IST2025-06-03T17:47:23+5:302025-06-03T17:49:55+5:30

Bhandara : मॅगनिज ट्रेडर्स व रिटेलर यांच्या पाठीशी आहे तरी कोण, याचा छडा लावणे आवश्यक झाले आहे

Manganese theft from Dongri Chikhla mine; whose blessing? | डोंगरी चिखला खाणीतून मँगनिज चोरी; आशीर्वाद कुणाचा?

Manganese theft from Dongri Chikhla mine; whose blessing?

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर :
आशिया खंडातील अग्रगण्य मँगनिज उत्पादक असलेल्या 'मॉयल'मध्ये सध्या चोरीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरी (बु) व चिखला खाणीतून दरवर्षी उत्खनन केलेले कोट्यवधी रुपयांचे मँगनिज चोरीला जात आहे. हे चोरीचे मँगनिज तेथील ट्रेडर्स व रिटेलर चोरट्यांकडून बिनदिक्कपणे खरेदी करीत असल्याने एकप्रकारे मँगनिज ट्रेडर्स, रिटेलर यांना गोबरवाही पोलिसांनी चोरीचे अवैध मँगनिज खरेदी करण्याची सूट दिल्याचे दिसत आहे. 


तुमसर तालुक्यात गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत चिखला व डोंगरी (बु) येथे ब्रिटिशकालीन मँगनिज खाण आहे. जगात हॉलंडनंतर उच्चप्रतीचे मँगनिज याच खाणीतून मिळते. या खाणीचा विस्तार प्रचंड मोठा आहे. मात्र मँगनिजवर आधारित कसलेही उद्योगधंदे या तालुक्यात नाही. त्यामुळे येथे छोटे-मोठे मँगनिजचे ट्रेडर्स व रिटेलर व्यावसायिक आहेत. ते मॉयलमधून ५० ते १०० टन मॅगनिज विकत घेतात. त्यावर प्रक्रिया व सफाई करून परत ते कंपनीला विक्रीस घालतात. अशा ट्रेडर्स व रिटेलरची संख्या तालुक्यात बऱ्यापैकी आहे. मात्र गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काही ट्रेडर्स व रिटेलरवर पोलिसांची मेहरनजर दिसून येत आहे. परिणामी खाणीतून व जंगल परिसरातून चोरलेले मँगनिज बिनदिक्कतपणे खरेदी करून ट्रेडर्स व रिटेलर्सनी कोट्यवधी रुपयांची माया आतापर्यंत जमवली आहे. ते निवडक मँगनिज ट्रेडर्स व रिटेलर कोण आहेत, याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Manganese theft from Dongri Chikhla mine; whose blessing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.