अंगणात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला; २ शेळ्या ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:00 IST2023-04-18T13:00:20+5:302023-04-18T13:00:45+5:30

गावात दहशतीचे वातावरण

Leopard attack on goats tethered in yard; 2 goats killed | अंगणात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला; २ शेळ्या ठार

अंगणात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला; २ शेळ्या ठार

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील मांढळ या गावात बिबट्याने अंगणात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. यात दोन शेळ्ळा ठार झाल्या. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

मार्कंड विठोबा वैद्य या पशुपालकाचे नाव आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी तीन शेळ्या पाळल्या होत्या. शेतामधून आल्यावर नेहमीप्रमाणे त्यांना अंगणात बांधून ते झोपी गेले असता ही घटना घडली. सकाळी या घटनेची माहिती लाखांदूर वनविभागाला दिल्यावर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे.

Web Title: Leopard attack on goats tethered in yard; 2 goats killed