भंडाऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:09 IST2025-08-16T19:08:44+5:302025-08-16T19:09:44+5:30

Bhandara : सुधारित अटींमुळे कमी प्रतिसाद; केवळ ९१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

In Bhandara, 22 thousand farmers turned their backs on the crop insurance scheme this year compared to last year. | भंडाऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे फिरवली पाठ

In Bhandara, 22 thousand farmers turned their backs on the crop insurance scheme this year compared to last year.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यात खरीप २०२५ साठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असली, तरी नव्या नियम आणि कडक अटींमुळे शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घटला आहे. यंदा केवळ ९१,४५४ शेतकरी या योजनेत सहभागी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २२,२५३ नी कमी आहे. वाढलेला विमा हप्ता आणि जोखीम कव्हरेजमधील कपात ही या घटीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. अंतिम नोंदणीची मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती.


विमा भरपाईचा इतिहास
गतवर्षी ६४.८८ लाख रुपये भरपाई देण्यात आली होती. शेतकऱ्यांचा मागील अनुभव चांगला असला तरी यावर्षी कमी सहभागाचे कारण म्हणजे स्वतः भरायची वाढलेली रक्कम आणि कव्हरेजमध्ये कपात करण्यात आली आहे.


यावर्षी प्रमुख बदलः
शेतकऱ्याने स्वतः भरायचा विमा हप्ता (प्रतिहेक्टर) :
धान : ५१२.५० रुपये प्रति हेक्टर
सोयाबीन : ९०.६३ रुपये प्रति हेक्टर
अतिवृष्टी, गारपीट, पूर, कीडरोग, काढणीनंतरची हानी अशा जोखीमांचा कव्हरेज रद्द. 


मुख्य मुद्देः
यंदाचा सहभागः १३ ऑगस्टपर्यंत
९१,४५४ शेतकऱ्यांनी विमा घेतला.
मागील वर्षाचा सहभाग : २०२४
मध्ये १,१३,७०७ शेतकरी सहभागी होते.
घट : यंदा २२,२५३ शेतकऱ्यांची घट.
विमा क्षेत्रफळः ३८,९१६ हेक्टर.
शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२५.


"योजनेच्या सुधारित मॉडेलमुळे शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित योग्य विमा संरक्षण मिळेल व हवामानाच्या अनिश्चिततेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होईल."
- संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.


 

Web Title: In Bhandara, 22 thousand farmers turned their backs on the crop insurance scheme this year compared to last year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.