उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा २ मिळणार हजार रुपये ! जाणून घ्या योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:28 IST2025-08-26T18:28:01+5:302025-08-26T18:28:26+5:30

'कमवा आणि शिका' : विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

Girls pursuing higher education will get Rs 2,000 per month! Know the scheme | उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा २ मिळणार हजार रुपये ! जाणून घ्या योजना

Girls pursuing higher education will get Rs 2,000 per month! Know the scheme

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. 'कमवा आणि शिका' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत, पात्र विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये कमावण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाचा इतर खर्च भागवता येईल.


दैनंदिन खर्च भागविण्यासाठी हाती पैसा
या योजनेत विद्यार्थिनींना त्यांच्या कामाच्या बदल्यात दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. यामुळे त्यांना शिक्षणादरम्यान येणारे दैनंदिन खर्च भागवणे शक्य होईल, जसे की शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, प्रवासाचा खर्च आदी.


विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता आधीच सुरू
या 'कमवा आणि शिका' योजनेच्या आधीच सरकारने शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वार्षिक सहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता सुरू केला आहे. आता ही नवीन योजना त्यासोबतच सुरू केली जाईल. दोन्ही योजना एकत्र आल्याने विद्यार्थिनींना आर्थिक मदत अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल.


'कमवा आणि शिका' योजना काय आहे?
या योजनेचा उद्देश मुलींना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे, हा आहे. या योजनेमुळे त्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च स्वतःच भागवता येईल. ही योजना महाविद्यालयांमार्फत राबवली जाईल, जिथे गरजू आणि पात्र विद्यार्थिनींना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.


अनेक विद्यार्थिनींना होणार लाभ
या योजनेचा लाभ दरवर्षी अनेक विद्यार्थिनींना मिळेल. सध्या, उच्च शिक्षणात मुर्लीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत आहे आणि ही योजना त्यापैकीच एक महत्त्वाचा टप्पा आहे.


लवकरच अंमलात येणार योजना
या योजनेची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. योजनेचे नियम आणि अटी अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मुलींच्या उच्च शिक्षणाला मोठी चालना मिळेल.

Web Title: Girls pursuing higher education will get Rs 2,000 per month! Know the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.